तरुण भारत

चीनमधील पुतियान शहर पूर्णपणे सील

चित्रपटगृहे-व्यायामशाळेसह सार्वजनिक ठिकाणे बंद

वृत्तसंस्था/ बीजिंग

Advertisements

चीनच्या फुजियान प्रांतातील एका शहरात चित्रपटगृहे, व्यायामशाळा आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत. येथील रहिवाशांना शहर न सोडण्याची ताकीद देण्यात आली आहे. स्थानिक स्तरावर कोरोना संक्रमण पुन्हा समोर आल्यावर चीनच्या या शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

फुजियानमधील पुतियान शहरात कोरोना संक्रमणाची स्थितीत गंभीर झाली आहे. येथे कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. पुतियान शहराची लोकसंख्या 32 लाख आहे. कोरोना संक्रमणाचा धोका पाहता चीनच्या नॅशनल हेल्थ अथॉरिटीने एक तज्ञांचे पथक तेथे पाठविले आहे. येथील काही शाळांमधील ऑफलाइन शिक्षणही रोखण्यात आले आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार 10-12 सप्टेंबरदरम्यान फुजियानमध्ये कोरोनाचे 43 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील 35 रुग्ण हे पुतियान शहरातील आहेत. याचबारेबर पुतियानमध्ये 10 सप्टेंबरपासून 32 लक्षणेरहित रुग्णही सापडले आहेत. पण चीन लक्षणेरहित लोकांची रुग्णांमध्ये गणना करत नाही.

12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण 95,248 कोरोनाबाधित सापडले आहोत. तर 4,636 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये यापूर्वी जियांग्सूमध्ये कोरोनाचा उद्रेक दिसून आला होता. जियांग्सूमध्ये एक महिन्यापर्यंत कोरोनाचे संक्रमण वाढले होते. पुतियानमधील लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाल्याचे चाचण्यांमधून समोर आले आहे.

Related Stories

सीमेवर सेनामाघार बव्हंशी पूर्ण : चीन

Patil_p

अफगाणिस्तानमध्ये कोसळले विमान

Patil_p

इम्रान सरकारच तालिबानचा ‘पाठिराखा’

Amit Kulkarni

जुने छायाचित्र शेअर केल्याने राहुल गांधी लक्ष्य

Patil_p

वर्षानंतर परस्परांना पाहू शकल्या जुळय़ा बहिणी

Patil_p

कोरोना उगमस्रोताबाबत चीनला WHO कडून क्लीनचिट?

datta jadhav
error: Content is protected !!