तरुण भारत

पुलवामामध्ये गस्तपथकावर गेनेड हल्ला

3 नागरिक जखमी

वृत्तसंस्था / श्रीनगर

Advertisements

काश्मीरमधील पुलवामा येथे गस्त घालत असलेल्या सीआरपीएफ-पोलीस यांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या ग्रेनेडचा सुरक्षा दलांपासून काही अंतरावर स्फोट झाल्याने जीवितहानी टळली आहे. तर या स्फोटात तीन स्थानिक नागरिक जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा हल्ला मंगळवारी दुपारी झाला आहे. सीआरपीएफ-पोलिसांचे संयुक्त पथक सुरक्षा व्यवस्थेवर नजर ठेवून असताना गर्दीचा लाभ घेत दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. दहशतवाद्यांनी फेकलेला हा ग्रेनेड दुसरीकडे पडून त्याचा स्फोट झाला. स्फोटानंतर बाजारपेठेत खळबळ उडाली आणि लोकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने दहशतवाद्यांना पलायन करता आले.

हल्ल्याची माहिती कळताच सैन्य, सीआरपीएफच्या जवानांनी परिसराला घेरून शोधमोहीम हाती घेतली आहे. तर बाजारपेठेत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचे चित्रणही तपासले जात आहे. हल्लेखोरांची ओळख पटताच धरपकड सुरू करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

7 दिवसांमध्ये काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर करण्यात आलेला हा  दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या छनपोरा भागात सीआरपीएफच्या गस्तपथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात एका जवानासह दोन जण जखमी झाले होते.

Related Stories

मतदार ओळखपत्रही आता डिजिटल

Patil_p

भारत-इस्रायलकडून विकसित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

Omkar B

मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलावर राहुल गांधी म्हणाले…

Rohan_P

मेक इन इंडियाला अमेझॉनचा हातभार

Patil_p

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन

Patil_p

2019 मध्ये दर 4 मिनिटात एकाची आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!