तरुण भारत

‘मारुती’ स्विफ्टच्या विक्री 25 लाखांच्या घरात

देशातील बाजारात कारला मजबूत मागणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) 16 वर्षाअगोदर देशातील बाजारात उतरली आहे. या प्रवासात सध्या प्रीमियम हॅचबॅक कार स्विफ्टच्या मॉडेलने 25 लाखांचा विक्रीचा आकडा पार केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. विक्रीतील ही कामगिरी नक्कीच दिलासादायक ठरली आहे.

कंपनीने सदर मॉडेलच्या विक्रीचा 25 लाखांचा टप्पा पार करत एकूण विक्रीत नवा विक्रम नोंदविला असल्याचे स्पष्ट केले आहे. स्विफ्ट हे मॉडेल कंपनीने 2005 मध्ये बाजारात सादर केले असून यासोबतच देशात नवीन प्रीमियम हॅचबॅकच्या वर्गास सुरुवातही केली होती.

सदरची कामगिरी साध्य करण्यासाठी ग्राहकांची उत्तम साथ मिळाली असून 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 52 टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांसोबत स्विफ्टने आपली नाळ युवा वर्गासोबत जोडली असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.

मजबूत प्रदर्शन

2005 मध्ये बाजारात प्रवेश केल्यानंतर स्विफ्टने भारतात प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटची सुरुवात केली होती. यामुळे आजही या मॉडेलचे लाखो प्रशंसक आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सर्वाधिक विक्रीची कार म्हणून स्विफ्टने आपली कामगिरी अधिक ठळक केली आहे.

Related Stories

‘किया’कडून ग्राहकांसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध

Amit Kulkarni

मर्सीडिझ बेंझची नवी जीएलए कार बाजारात

Patil_p

90 कि.मी. मायलेजवाली बजाजची दुचाकी दाखल

Patil_p

महिंद्राचे अंतिम तिमाहीत उत्पादन, विक्रीत घटीचे संकेत

Patil_p

सोनेटची विक्री 1 लाखावर

Patil_p

‘REVOLT 400’ च्या किंमतीत वाढ

tarunbharat
error: Content is protected !!