तरुण भारत

झोमॅटोचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

झोमॅटो या ऑनलाईन अन्न पुरवठा करणाऱया कंपनीचे सहसंस्थापक गौरव गुप्ता यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीमध्ये पुरवठा विभागाचे ते प्रमुख म्हणून काम करत होते.

Advertisements

 मागील दोन महिन्यांच्या अगोदर झोमॅटोने स्वतःला शेअर बाजारात सुचीबद्ध केले होते. कंपनीच्या आयपीओंमध्ये गुप्ता यांची मोठी भूमिका राहिली आहे. दुसरीकडे 2015 मध्ये झोमॅटोशी जोडले गेले होते. 2018 मध्ये ते कंपनीचे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर बनले होते.

झोमॅटोमध्ये गुप्ता यांचा मंगळवारी शेवटचा दिवस राहणार असल्याची माहिती असून सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ता नवीन कंपनी सुरु करण्याचे संकेत आहेत. तसेच ते आपल्या परिवारांसोबत वेळ घालविणार असल्याची माहिती आहे.

सहा वर्षांच्या अगोदर 2015 मध्ये टेबल रिझर्व्हशन हेड म्हणून झोमॅटोमध्ये गौरव गुप्ता यांनी आपला प्रवास सुरु केला होता. त्यांना 2019 मध्ये कंपनीचे सहसंस्थापक बनविले होते.

न्यूट्रिशनसह ग्रॉसरीवर फोकस

गुप्ता यांनी झोमॅटोचा न्यूट्रिशन आणि ग्रॉसरी बिझनेस सुरु करण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. मागील आठवडय़ात कंपनीने हे व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली. त्यांनी विदेशात कंपनीच्या व्यवसायाचे नेतृत्व केले होते.

Related Stories

एमजी मोटर्सच्या अडचणी वाढल्या

Patil_p

सोनालिकाचा इलेक्ट्रीक ट्रक्टर बाजारात

Omkar B

उन्हाळा सुरू होताच पंखे मागणीत वाढ

Patil_p

रियलमीचे वर्षा अखेरपर्यंत कर्मचारी संख्या वाढविण्याचे ध्येय

Patil_p

अस्थिरतेचे सावट; पण…

Patil_p

शेअर बाजार दुसऱया सत्रातही तेजीत

Patil_p
error: Content is protected !!