तरुण भारत

नव्या फोन्सच्या लाँचिंग संख्येत घट होणार

चिप कमतरतेचा प्रभाव शक्य – चालू वर्षातील लाँचिंगची स्थितीः 190 फोन्स सादर होणार

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

मागील काही दिवसांपासून जगभरातून इलेक्ट्रिक चिपच्या कमतरतेचा प्रभाव दिसून येत आहे. वाहन उत्पादनांसह इलेक्ट्रिक वाहन, स्मार्टफोनसह अन्य इलेक्ट्रिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी चिपची गरज लागते. परंतु याचा फटका मोबाईल फोन कंपन्यांना बसणार असून त्यांना त्यांचे फोन येत्या काळात बाजारात दाखल करण्यात अडथळे जाणवणार आहेत. 

प्राप्त अहवालानुसार मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात फोन सादरीकरणांची संख्या कमी होण्याचे संकेत असून यामध्ये लहान मोठय़ा ब्रँडस्ना याचा फटका बसण्याची अधिक शक्यता आहे.

मागील वर्षात(वर्ष 2020) एकूण 207 फोन्स भारतीय बाजारात सादर करण्यात आले होते. तर चालू वर्षात आतापर्यंत फक्त 103 फोन्सच सादर करण्यात आले आहेत. प्राप्त अहवालानुसार चालू वर्षात 190 मॉडेल सादर होण्याचे संकेत आहेत. म्हणजे नवीन लाँचिंगमध्ये फोन्सची संख्या कमी असणार आहे. साधारणपणे देशातील सर्वात मोठी दुरसंचार कंपनी जिओने आपल्या नेक्स्ट फोनचे सादरीकरण लांबणीवर टाकले होते.

अन्य साहित्याची कमतरता

मोबाईल फोनच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱया साहित्यामध्ये चिप महत्वाची आहे. तसेच अन्य साहित्याची गरज आहे.

टॉप ब्रँडचे लाँचिंग लांबणीवर

काउंंटरपाँईटच्या माहितीनुसार जगभरातील अव्वल ब्रँडचे लाँचिंग लांबणीवर पडले आहे. फोन सादर करणाऱया कंपन्यांसमोर उत्पादन घेण्याची समस्या, किमतीमधील वाढ व अन्य समस्या असून येत्या काळात ही स्थिती लवकर न बदलल्यास स्मार्टफोन्सच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

ई-फसवणुकीपासून सावधान

tarunbharat

विवो वाय 20 लवकरच भेटीला

Patil_p

2022 मध्ये ओएलइडी फीचर्सचे स्मार्टफोन लोकप्रिय

Patil_p

संगणक क्रांतीचे युग

tarunbharat

गॅलेक्सी एम 12 बाजारात दाखल

Amit Kulkarni

मोटो जी 60, मोटो जी 40 फोन दाखल

Patil_p
error: Content is protected !!