तरुण भारत

‘ओला’च्या कारखान्याची धुरा महिलांच्या हाती

सीईओ भाविश अग्रवाल यांची घोषणा – वर्षाकाठी 10 लाख दुचाकींचे उत्पादन घेणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

तामिळनाडूमधील ओला मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प ‘ओला कारखान्याची’धुरा संपूर्णपणे महिला कर्मचाऱयांच्या हातात राहणार आहे. या संदर्भात ओलाचे अध्यक्ष व समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल यांनी घोषणा केली असून ‘आत्मनिर्भर भारताला आत्मनिर्भर महिलांची’ आवश्यकता असल्याचाही उल्लेख यावेळी भाविश यांनी केला आहे.

ओलाचा कारखाना जगातील सर्वात मोठा कारखाना राहणार असून महत्त्वाचे म्हणजे फक्त महिलाच हा कारखाना सांभाळणार आहेत. या कारखान्याचा विस्तार 500 एकरात राहणार आहे. सदरच्या कारखान्यात पूर्ण क्षमतेने काम सुरु करण्यात आल्यानंतर यामध्ये 10,000 पेक्षा अधिक महिलांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

वर्षांला 10 लाख दुचाकींची निर्मिती

प्रारंभीच्या काळात वर्षाला 10 लाख दुचाकींची निर्मिती करणार असून बाजारातील मागणीनुसार पुढील उत्पादनाचा टप्पा निश्चित केला जाणार आहे. पुढे 20 लाख दुचाकी वर्षाला उत्पादन घेणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

महिलांसाठी नवी संधी

ओलाच्या कारखान्यात निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. ओलाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी महिलांना नोकरीची संधी दिली जाणार आहे, असे सीईओ भाविश यांनी म्हटले आहे.

15 सप्टेंबरपासून स्कूटरची विक्री 

ओला इलेक्ट्रिकने ओला स्कूटर एस1 ची विक्री आठवडय़ाभराने लांबणीवर टाकली होती. गेल्या आठवडय़ात गाडीची विक्री सुरू होणार होती. वेबसाईटवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आजपासून (15 सप्टेंबर) विक्री सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

10 हजार कोटींच्या व्यवहारावर टाटा-बिगबास्केटची सहमती

Omkar B

टीजेएसबीच्या नफ्यात विक्रमी वाढ

Patil_p

1 सप्टेंबरला दोन आयपीओ येणार

Patil_p

शेअर बाजारात सेन्सेक्समधील तेजी कायम

Patil_p

‘टाटा’चे बुलंद इरादे!

Omkar B

दोन सत्रांच्या तेजीला विराम !

Patil_p
error: Content is protected !!