तरुण भारत

जागतिक संकेतामुळे शेअर बाजारात तेजी

सेन्सेक्स 69 तर निफ्टी 24 अंकांनी मजबूत स्थितीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत. जागतिक पातळीवर मिळता-जुळता कल राहिल्याने प्रमुख क्षेत्रांपैकी आयटी, बँक आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत राहिल्याने बाजाराला उभारी मिळाली आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 69.33 अंकांसह 0.12 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 58,247.09 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 24.70 अंकांसोबत 0.14 टक्क्यांच्या तेजीसोबत निर्देशांक 17,380.00 चा उच्चांक प्राप्त करत बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी सर्वाधिक चार टक्क्यांनी इंडसइंड बँकेचे समभाग तेजीत राहिले आहेत. यासह एचसीएल, बजाज ऑटो, टेक महिंद्रा, लार्सन ऍण्ड टुब्रो व कोटक बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, टाटा स्टील तसेच बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.80 टक्क्यांनी मजबूत होत 74.10 प्रति डॉलर बॅरेलवर पोहोचले आहे. बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांनी भांडवली बाजारात सोमवारी 1,419.31 कोटी रुपयांच्या कोटी मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. सध्या सणासुदीचा कालखंड असल्याने बाजारातपेठांमध्ये सकारात्मक उलाढाल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. येत्या काळात दसरा-दिवाळी हे मोठे सण येणार असून तेव्हा कोरोनाची तिसरी लाट कितपत प्रभाव टाकते त्यावर बाजाराची दिशा निश्चित होणार असल्याचा अंदाज अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये सिओल व टोकीओ यांच्यामध्ये सकारात्मक कल राहिला असून हाँगकाँग आणि शांघाय नुकसानीत राहिले आहेत.

Related Stories

फेसबुकची वर्क फ्रॉम होम योजना 2021 पर्यंत

Patil_p

हिरोमोटोचा 32 दिवसांमध्ये वाहन विक्रीचा उच्चांक

Patil_p

संदीप सिक्कांची सीईओपदी पुनर्नियुक्ती

Patil_p

ऍमेझॉन, वेरीझॉन व्होडाफोन आयडियात गुंतवणूक करणार

Patil_p

थरमॅक्सला मिळाली 293 कोटींची ऑर्डर

Amit Kulkarni

वाहन उद्योगाला दररोज 2300 कोटींचा फटका

Omkar B
error: Content is protected !!