तरुण भारत

गणेशोत्सवाचा आनंद घेताना..!

आरटीपीसीआरची सक्ती न केल्याने गेले दीड वर्ष कोरोनाच्या सावटाखाली राहून कंटाळलेले चाकरमानी या वषी विक्रमी संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेत. कोकणात सध्या मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. एकामागोमाग एक अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले, तरीही ही संकटे बाजूला सारत गणेशोत्सव धुमधडाक्मयात सुरू आहे. मात्र हाच गणेशोत्सव कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या निमंत्रणाचे निमित्त न ठरता बाप्पाच्या कृपेने कोरोनाचे संकट दूर करणारा ठरुदे, हीच प्रार्थना!

कोरोनाच्या महासंकटामुळे गेल्या दीड वर्षात कुठलाच सण मोठय़ा उत्साहात साजरा करता आला नाही. मात्र यावषीचा गणेशोत्सव कोकणात मोठय़ा उत्साहात साजरा होताना दिसत आहे. कोरोनाच्या सावटामुळे मागीलवेळी गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांवर अनेक निर्बंध लावले गेले होते. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असल्याने आता तरी निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी होऊ लागल्यावर सर्वांच्या मागणीनुसार गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांना आरटीपीसीआर सक्तीची नव्हती. कोकणात आल्यावर रेल्वे व बसस्थानकावर किंवा घरी जाऊन रॅपिड टेस्ट करणार, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु रॅपिड टेस्टही करण्यात आल्या नाहीत. विक्रमी संख्येने चाकरमानी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात दाखल झाले आहेत व अगदी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

Advertisements

कोकणात सणांचे एवढे औसुक्मय आहे की, प्रत्येक सण फार उत्साहाने साजरा केला जातो. श्रीमंतांच्या बंगल्यात आणि गरिबांच्या झोपडीतही तोच उत्साह असतो. कोकणात सर्वत्र साजरा होणारा सण म्हणजे गणेशोत्सव. या गणेशोत्सवात कोकणातील प्रत्येक घरातील व्यक्ती जी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने कोकणाबाहेर शहरात राहते, तिला दरवषी गणेशोत्सवाचे वेध लागलेले असतात. त्यामुळे गणेशोत्सवात इतर वेळी कधीही न येणारा चाकरमानी या उत्सवात गावाकडे येतोच येतो.

शहरात उद्योग व्यवसायानिमित्त रमणारा चाकरमानी गणेशोत्सव जवळ आल्यावर अस्वस्थ होतो. चाकरमान्यांना श्रावण महिना सुरू झाला की गणेशोत्सवाचे वेध लागतात. मुंबईत राहूनही अनेक दिवस एकमेकांची गाठभेट न होणाऱया जीवलगांची होणारी भेट हा आनंद द्विगुणित करतो. त्यामुळे ओढ आणखी लागते आणि गणेशोत्सवात गावी जाण्याची धावपळ सुरू होते. गतवषी कसे तरी मन मारून गणेशोत्सवापासून लांब राहिलेल्या चाकरमान्यांना यावषी स्वतःला आवरणे अवघड झाले होते. यावषीही कोरोनाचे सावट आहेच. मात्र कोकणातील चाकरमानी मोठय़ा संख्येने येण्यासाठी धडपड करू लागले. त्यामुळे कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या. त्याशिवाय एसटी, खासगी बसेसही मोठय़ा प्रमाणात सोडण्यात आल्या. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात पाच लाखांवर चाकरमानी दाखल झाले.

महाराष्ट्रातील इतर भागात सार्वजनिक गणेशोत्सव महत्त्वाचा मानून साजरा केला जातो. या उलट कोकणात सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण कमी असून घरोघरी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. त्यामुळेच कोकणातील गणेशोत्सवाचे स्वरुप हे आगळेवेगळे आहे. कोकणातील गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सारेजण उत्साहाने व भक्तीभावाने हा उत्सव साजरा करतात. दरवषी हे स्वरुप असेच असते. यावषीही कोरोना तर आहेच. परंतु त्याचबरोबर कोकणात महापूर, वादळे अशी अनेक संकटे आली. असंख्य संसार यात उघडय़ावर आले. अनेकांनी रोजीरोटी गमावली. या अशा ओढवलेल्या नैसर्गिक संकटांवर मात करीत कोकणातील प्रत्येक नागरिक गणेशोत्सव अगदी मनोभावे साजरा करीत आहे.

चाकरमानी असो की स्थानिक ग्रामस्थ. सर्वांनीच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याची काळजी घेऊनच सण साजरे करायला हवेत. कोरोना कमी झाला आहे. परंतु संपलेला नाही. त्यामुळे काही झालं तरी प्रत्येकाने काळजी ही घेतलीच पाहिजे. कोरोना चाकरमान्यांमुळे फैलावतोय की स्थानिकांमुळे यावर काथ्याकुट न करता सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे आणि कोरोनाचे संकट रोखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.

गेल्या काही महिन्यांपासून अर्ध्याअधिक महाराष्ट्रात निसर्गाने रौद्र रुप धारण केल्याने अनेकांचे संसार संकटात आले आहेत. गणेशोत्सवानंतर येणाऱया सर्व सणासुदीच्या दिवसांवर तीव्र दुष्काळाचे आणि न संपलेल्या कोरोनाचे सावट कायम आहे. म्हणून यावेळी गणेशोत्सव साजरा करीत असताना परिस्थितीचे भान ठेवत राष्ट्रीय एकात्मता, सलोखा, सर्व धर्म समभाव आणि आपापल्या कुटुंबाचे आरोग्य याचे पुरेपूर भान ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राला साजेसा गणेशोत्सव सोहळा पार पाडायला हवा. सर्व दुःख दूर करणारा श्री गणेश कोकणातीलच नव्हे, तर जगावरील संकटे दूर करेल आणि पुन्हा सर्वत्र आनंदी आनंद पसरेल, अशी आशा व्यक्त करुया. त्याचबरोबर कोकणात उद्योग व्यवसायाची उभारणी होऊन आर्थिक समृद्धी येईल, अशी अपेक्षा ठेवूया.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ांत आता कोरोना बऱयापैकी नियंत्रणात आला आहे. मृत्यू पडणाऱया रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. रत्नागिरी जिल्हय़ात आतापर्यंत 76 हजार 993 कोरोना बाधित रुग्ण आढळलेले असून त्यातील 73 हजार 671 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 2 हजार 373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 949 सक्रिय रुग्ण आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 51 हजार 241 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 48 हजार 553 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 1 हजार 378 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे व 1 हजार 308 सक्रिय रुग्ण आहेत. कोकणातील ही परिस्थिती पाहिली, तर कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या कमी होताना दिसत असल्याने दिलासा देणारी बाब ठरत आहे. परंतु सद्यस्थितीत आरटीपीसीआर टेस्टिंगचे प्रमाण फारच कमी झाले आहे. टेस्टिंगचे प्रमाण कमी झाल्याने कोरोना रुग्ण संख्या कमी तर झाली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच गणेशोत्सवाला जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांचीही टेस्टिंग झालेली नाही.

कोकणात सध्या अगदी मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव होतो आहे. सर्व बाजारपेठा गर्दीने गजबजून गेल्या आहेत. घराघरात भजने, आरत्या, फुगडय़ा मोठय़ा उत्साहात सुरू आहेत. मात्र हाच उत्साह कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या निमंत्रणास कारण ठरणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली, तर निश्चितपणे कोरोनाचे संकट दूर होईल, हे निश्चित.

संदीप गावडे

Related Stories

लालबागचा स्तुत्य निर्णय

Patil_p

चाकरमान्यांसाठी नियोजन होणार कधी ?

Patil_p

मुक्त पुरुष ऐकणे, वास घेणे आणि खाणे या क्रियात ईश्वरस्वरूप अनुभवत असतो

Patil_p

मनुष्यदेह हाच मुख्य गुरु

Patil_p

टेलिफोन हेरगिरीः सर्वोच्य न्यायालयाचा दणका

Patil_p

निरर्थक गदारोळ

Patil_p
error: Content is protected !!