तरुण भारत

घाऊक महागाई निर्देशांकात वाढ

तेल, कापड, रासायनिक उत्पादनांच्या किंमती वाढल्या

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

ऑगस्टमध्ये घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक पुन्हा वाढल्यामुळे महागाईमध्ये वाढ झालेली दिसत आहे. मुख्य उत्पादित वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे जुलैमधील 11.16 टक्क्मयांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये महागाई दर 11.39 टक्के इतका झाला आहे. ऑगस्टमध्ये घाऊक महागाई वाढल्याने खाद्यतेल, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, मूलभूत धातू, कापड, रासायनिक उत्पादनांच्या किंमती वाढल्या आहेत.

सलग पाचव्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक दुहेरी अंकात आहे. तेल आणि कांद्याचे भाव वाढल्यामुळे मागील महिन्यात हा दर वाढलेला दिसतो, असे सीआरसीएलचे एमडी आणि सीईओ डॉ. डीआरई रेड्डी यांनी म्हटले आहे. घाऊक किंमत निर्देशांकाची (डब्ल्यूपीआय) आकडेवारी देशभरातील निवडक उत्पादन युनिट्सकडून प्राप्त झालेल्या डेटावरून काढली जाते. प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी हे दर जाहीर केले जातात.

किरकोळ महागाईचे दर जाहीर होण्यापूर्वी ऑगस्टमधील रिटेल महागाई दरही जाहीर झाले होते. रिटेल महागाई दरात किंचित घसरण होऊन तो सध्या 5.3 टक्क्मयांवर आला आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई गेल्या जुलै महिन्यात 5.59 टक्के होती. तर मागील वर्षीच्या ऑगस्टमध्ये हा दर 6.69 टक्के होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांमध्ये महागाई जुलैमध्ये 3.96 टक्क्मयांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 3.11 टक्के होती. रिझर्व्ह बँकेने ऑगस्टमध्ये द्विमासिक आर्थिक पतधोरण दर ‘जैसे थे’ ठेवले होते. त्याचा परिणामही महागाई दरावर झालेला दिसतो.

Related Stories

शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

Amit Kulkarni

मोदींच्या विश्वासू सहकाऱयाला उत्तरप्रदेशात मोठी जबाबदारी

Patil_p

भारतीय ‘फौ-जी’ चे 10 लाख चाहते

Patil_p

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त

Amit Kulkarni

देशात 59,118 रुग्णांची वाढ

datta jadhav

मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांचे निधन

Patil_p
error: Content is protected !!