तरुण भारत

सहा संशयित दहशतवाद्यांना अटक

 पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोघांचा समावेश – शस्त्रे-स्फोटकांचा मोठा साठा जप्त

पाकिस्तानचे दहशतवादी मॉडय़ूल उघड

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पाकिस्तानचा मोठा दहशतवादी कट दिल्लीत उघड झाला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोठय़ा प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आली. या कारवाईनंतर अतिदक्षता पाळली जात असून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

संशयित दहशतवाद्यांचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले होते. त्यांच्या वास्तव्याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये छापे टाकत मोठे दहशतवादी मॉडय़ूल उद्ध्वस्त केले. अटक करण्यात आलेले संशयित देशभरात सीरियल बॉम्बस्फोटांचे नियोजन करत असल्याची माहितीही उघड झाली आहे. सणांच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे काम येत्या सणासुदीच्या काळात आयआयडी लावणे होते. नवरात्री आणि रामलीला उत्सवादरम्यान गर्दीचे क्षेत्र निवडून घातपात घडवण्याची त्यांची योजना होती, असे दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी कारवाईनंतर स्पष्ट केले.

दहशतवाद्यांच्या अटकेसाठी विविध राज्यांमध्ये व्यापक मोहीम राबविण्यात आली. बहुराज्यीय कारवाईदरम्यान दोन मुख्य दहशतवाद्यांव्यतिरिक्त आणखी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. एकंदर 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून पकडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या दोन दहशतवाद्यांची नावे ओसामा आणि झिशान कमर अशी आहेत. याखेरीज मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला अशी अन्य अटक केलेल्यांची नावे आहेत. दहशतवाद्यांकडून स्फोटके, शस्त्रे आणि उच्च दर्जाचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

मस्कतमधून पाकिस्तानपर्यंत प्रवास

संशयित दहशतवाद्यांबाबत 10 टेक्निकल इनपुट्स प्राप्त झाले होते. त्यानुसार प्रथम महाराष्ट्रातून सालेम याला पकडण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीत दोघांना अटक झाली. यानंतर तिघांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली. यातील दोघेजण एप्रिलमध्ये मस्कतला गेले होते. त्यांना मस्कतहून जहाजाने पाकिस्तानला नेण्यात आले. तेथे त्यांना फार्म हाऊसमध्ये ठेवून स्फोटके बनवणे आणि एके-47 चालवण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे चौकशीअंती उघड झाल्याचे दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले.

Related Stories

संरक्षण अन् एअरोस्पेस क्षेत्रात संशोधनाला बळ

Patil_p

वैद्यकीय मंत्र्यांचे उत्तर; विरोधकांचा सभात्याग

Omkar B

दुसऱ्याच्या भूमीत घुसून अद्दल घडवण्यास सज्ज

Patil_p

सुशिलकुमारचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Patil_p

इन्फोसिसचे बाजार भांडवल 7 लाख कोटींवर

Patil_p

दिल्लीत भिषण आग, अनेकजण अडकले

prashant_c
error: Content is protected !!