तरुण भारत

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ‘सेल्फ आयसोलेट’

मॉस्को / वृत्तसंस्था

रशियात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या काही सहकाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा वैद्यकीय  अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानंतर दक्षता म्हणून पुतिन यांनी सेल्फ आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. पुतिन यांनी यापूर्वीच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तरीही त्यांनी सावधगिरी म्हणून कार्यालयीन सहकाऱयांपासून लांब राहणे पसंद केले आहे. त्याचबरोबर त्यांची भेट घेणाऱयांनाही क्वारंटाईन केले जात आहे.

Advertisements

पुतिन यांच्यासाठी विशेष वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे. क्वारंटाईनचा अवधी पूर्ण केल्याशिवाय राष्ट्रपती पुतिन यांना कुणीही भेटू शकणार नाही. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे. सध्या ते पूर्णपणे निरोगी असून त्यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

भारताकडून चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी

datta jadhav

अन् कुत्र्याच्या नावे लिहली 36 कोटीची मालमत्ता

Patil_p

पाऊस अन् हिमवृष्टीवर नियंत्रण मिळविणार चीन

Patil_p

पाकिस्तान कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा फेरविचार करणार

datta jadhav

नेपाळच्या विदेशमंत्रिपदी नारायण खडका

Patil_p

सत्ता सोडण्यापूर्वी ट्रम्प यांनी दिला चीनला धक्का

datta jadhav
error: Content is protected !!