तरुण भारत

एसबीआयकडून कर्ज स्वस्त

बेस रेट अन् पीएलआरमध्ये कपात – कमी भरावा लागणार ईएमआय

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिलासा देत व्याजदरांमध्ये कपातीची घोषणा केली आहे. आधार दरांवर (बेस रेट्स) 5 आधार अंक म्हणजेच 0.05 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय एसबीआयने मंगळवारी घेतला आहे. तर लेंडिंग रेटमध्ये (पीएलआर) देखील 5 आधार अंकांची कपात करत 12.20 टक्के करण्यात येईल. नवे दर 15 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहेत.

एसबीआयच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या खिश्यावर थेट प्रभाव पडणार आहे. यामुळे एसबीआयच्या ग्राहकांना आता गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्जासमवेत अनेक प्रकारच्या कर्जाचा मासिक हप्ता कमी भरावा लागणार आहे. जुलै 2010 नंतर घेण्यात आलेली सर्व गृहकर्जे बेस रेटशी संलग्न आहेत. याप्रकरणी कॉस्ट ऑफ फंड्सची मोजणी सरासरी फंड कॉस्टच्या हिशेबाने करण्याची किंवा एमसीएलआरच्या हिशेबाने करावी याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बँकांना आहे.

Related Stories

हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जोडले अक्षरांशी अक्षय नाते

prashant_c

भटक्या श्वानांचा ‘रॉबिनहुड’

Amit Kulkarni

भारतीय सैनिकांनी काश्मिरमध्ये केली ‘दगडूशेठ’ गणपतीची स्थापना

Rohan_P

डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेत अस्मिता सावंत,अलका पांड्ये विजयी

prashant_c

25 वर्षांच्या जावयाशी 50 वर्षांची सासू विवाहबद्ध

Patil_p

ऑनलाईन पद्धतीने दत्तभक्त करणार ‘घोरात्कष्टात स्तोत्रा’चे सामुदायिक पठण

Rohan_P
error: Content is protected !!