तरुण भारत

भालाफेक प्रशिक्षक हॉनची उचलबांगडी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जर्मनीचे 59 वर्षीय भालाफेक प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक युवे हॉन यांच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी संपुष्टात आल्याची घोषणा अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने सोमवारी केली. हॉन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कामगिरीबाबत फेडरेशन समाधानी नसल्याचे सांगण्यात आले. आता लवकरच भारतीय भालाफेक ऍथलीट्ससाठी दोन विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

Advertisements

जर्मनीचे भालाफेक प्रशिक्षक तसेच माजी विश्वविक्रमवीर हॉन यांचा अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन बरोबरचा करार टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत करण्यात आला होता. हॉन यांच्या प्रशिक्षकपदाच्या कामगिरीबाबत फेडरेशन समाधानी नसल्याने लवकरच दोन नवे विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती फेडरेशनचे अध्यक्ष सुमरीवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनच्या नियोजन समितीचे चेअरमन ललित भानोत तसेच उपाध्यक्षा अंजु बॉबी जॉर्ज उपस्थित होते. 2017 च्या नोव्हेंबर महिन्यात हॉन यांची प्रमुख प्रशिक्षकपदी फेडरेशनने एक वर्षांसाठी नियुक्ती केली होती. हॉन यांचे टोकियो ऑलिंपिक भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा त्याचप्रमाणे शिवपाल सिंग आणि अनु राणी यांना मार्गदर्शन लाभले होते.

2018 च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेनंतर जर्मनीचे बार्टोनिझ यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपविण्यात आली होती. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी हॉन यांच्या वक्तव्याने ऍथलेटिक्स क्षेत्रात वादळ निर्माण झाले होते. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळ (साई) आणि अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशन यांच्याकडून करार स्वीकारताना आपली फसवणूक केल्याचे आरोप हॉन यांनी केले होते पण त्यानंतर हॉन यांचे हे आरोप साई आणि अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने धुडकावून लावले होते. अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनची येथे बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये कनिष्ठ गटातील ऍथलीट्सच्या विकास योजनेचा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरविले आहे. भारतीय ऍथलीट्सना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी अधिक स्पर्धांची जरूरी आहे. पुढील वर्षीच्या ऍथलेटिक्स कार्यक्रमाच्या वेळापत्रकामध्ये भारतीय ऍथलीट्सना तीन महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयारी करावी लागेल. विश्व ऍथलेटिक्स स्पर्धा, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धा या कालावधीत होणार आहे. नजीकच्या काळात भारताच्या कनिष्ठ ऍथलीट्ससाठी दोन विदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती लवकरच केली जाणार असल्याचे सुमरीवाला यांनी सांगितले. फेडरेशनतर्फे प्रशिक्षण अभ्यास कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.

Related Stories

भारत-श्रीलंका दुसरी टी-20 लढत आज

Patil_p

इंग्लंड कसोटी संघात बेसचा समावेश

Patil_p

विसरावा असा ‘ओटीपी’ : सेहवाग

Patil_p

वास्कोत आज अपराजित हैदराबाद एफसीचा सामना मुंबईशी

Patil_p

नीरज चोप्रा खेलरत्नसाठी नामांकित

Patil_p

हॅलेप, सेरेना, जोकोविच, व्हेरेव्ह चौथ्या फेरीत

Patil_p
error: Content is protected !!