तरुण भारत

मिताली राज, लिझेली ली संयुक्त पहिल्या स्थानी

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीने मंगळवारी घोषित केलेल्या महिला वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार मिताली राज तसेच दक्षिण आफ्रिकेची सलामीची फलंदाज लिझेली ली यांनी संयुक्त पहिले स्थान मिळविले आहे. विंडीजविरूद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात लीने नाबाद 91 धावा झळकविल्याने तिने मिताली राजसमवेत फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पहिले स्थान पटकाविले.

Advertisements

महिला वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत मिताली राज आणि ली यांनी प्रत्येकी 762 मानांकन गुण घेत संयुक्त पहिले स्थान पटकाविले आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची हिली तिसऱया तसेच भारताची स्मृती मानधना संयुक्त नवव्या स्थानावर आहे. 2018 च्या जूनमध्ये लीने या मानांकन यादीत पहिले स्थान मिळविले होते. गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी अनुक्रमे पाचवे आणि नववे स्थान पटकाविले आहे. अष्टपैलूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा पाचव्या स्थानावर आहे. महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकनात भारताची शफाली वर्मा 759 मानांकन गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी 744 गुणांसह दुसऱया आणि भारताची उपकर्णधार स्मृती मंदाना 716 गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची शर्मा दहाव्या तर यादव आठव्या स्थानावर आहे.

Related Stories

चेल्सीच्या विजयात लुकाकूचे दोन गोल

Patil_p

अचंता शरथ कमलची आगेकूच

Patil_p

नव्या आयपीएल संघांसाठी 17 ऑक्टोबरला लिलाव

Patil_p

…रशियाच्या माखोव्हवर चार वर्षांची बंदी

Patil_p

युवेंट्सच्या विजयात रोनाल्डोचे दोन गोल

Patil_p

अनिर्णीत सामन्यात मुंबईला तीन गुण

Patil_p
error: Content is protected !!