तरुण भारत

मुरली यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी

वृत्तसंस्था/ जयपूर

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय ऍथलीट्सच्या निराशाजनक कामगिरीमुळे उंचउडी प्रकारात भारतीय ऍथलीट एम. श्रीशंकरचे वडील आणि प्रशिक्षक एस मुरली यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय सोमवारी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने घेतला.

Advertisements

अलिकडेच झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत एम. श्रीशंकरची कामगिरी चांगली झाली नाही. दरम्यान येथे झालेल्या दोन दिवसांच्या फेडरेशनच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये श्रीशंकरचे वडील आणि प्रशिक्षक एस.मुरली यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 22 वर्षीय श्रीशंकरला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी चाचणीवेळी तंदुरूस्ती समस्येला तोंड द्यावे लागले होते तरी पण अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने प्रशिक्षक एस. मुरलीच्या लेखी आश्वासनामुळे श्रीशंकरला ऑलिंपिक स्पर्धेसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. पण या स्पर्धेत त्याने साफ निराशा केल्याने त्याचा प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय फेडरेशनने घेतल्याची माहिती अध्यक्ष सुमरीवाला यांनी दिली.

Related Stories

SL vs IND: क्रिकेटर क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण

Rohan_P

अंकिता, दिविज शरण यांचे ‘अर्जुन’साठी नामांकन होणार

Patil_p

कोल्हापूरला‘महाराष्ट्र केसरी’ची 19 वर्षे हुलकावणी 

triratna

विम्बल्डनसाठी व्हीनस, अँडी मरेला वाईल्डकार्ड प्रवेश

Patil_p

सुनील दावरचा नवा राष्ट्रीय विक्रम

Patil_p

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा विजयी श्रीगणेशा

Patil_p
error: Content is protected !!