तरुण भारत

दिल्ली संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या ड्वारशुईसचा समावेश

वृत्तसंस्था/ दुबई

2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये 19 सप्टेंबरपासून खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने इंग्लंडच्या ख्रिस वोक्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा नवोदित वेगवान गोलंदाज बेन ड्वारशुईसचा बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियाचा 27 वर्षीय वेगवान गोलंदाज ड्वारशुईसने आतापर्यंत 82 लिस्ट ए आणि टी-20 सामन्यात  अनुक्रमे 12 आणि 100 बळी मिळविले आहेत. बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत त्याने आतापर्यंत 69 सामन्यांत 85 बळी मिळविले आहेत. ड्वारशुईस यापूर्वी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता. दिल्ली कॅपिटल्स संघातील इंग्लंडचे खेळाडू वोक्स, बेअरस्टो आणि मलान या स्पर्धेसाठी उपलब्ध होवू शकणार नाहीत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ 8 सामन्यांतून 12 गुणांसह आघाडी आहे.

Related Stories

गोपीचंदसह 4 प्रशिक्षक उपलब्ध करुन द्या

Patil_p

झेकमध्ये पुढील आठवडय़ात प्रेक्षकांच्या उपस्थितीत टेनिस स्पर्धा

Patil_p

सर्बियाचे फुटबॉल प्रशिक्षक ऍन्टीक कालवश

Patil_p

मनोज दशरथनचा पलानीवर विजय

Patil_p

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह; 3 सदस्य आयसोलेट

datta jadhav

इब्राहिमोविकला स्वीडनचा गोल्डन बॉल पुरस्कार

Omkar B
error: Content is protected !!