तरुण भारत

भारत उपांत्य फेरीत दाखल

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड – टायब्रेक लढतीत युक्रेनवर एकतर्फी मात

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisements

युक्रेनचा कडवा प्रतिकार टायब्रेकरमध्ये मोडून काढत भारताने फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या उपांत्य फेरीत धडक मारली. बी.अधिबन, द्रोणावली हरिका व निहाल सरिन यांनी भारतीय विजयात मोलाची भूमिका बजावली.

ब्लिट्झ टायब्रेकमध्ये भारताने युक्रेनवर 5-1 अशी एकतर्फी मात करीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. त्यात अधिबन, हरिका, सरिन व आर. वैशाली यांच्या विजयांचा समावेश आहे. भारताची अव्वल महिला बुद्धिबळपटू कोनेरू हंपीने लुलिया ओस्माकला बरोबरीत रोखले तर माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदच्या जागी अव्वल पटावर खेळणाऱया विदित गुजराथीने अनुभवी व्हॅसील इव्हान्चुकला बरोबरीत रोखले.

ब्लिट्झ टायब्रेकमध्ये अधिबनने लार्सन इंडियन व्हेरिएशनच्या डावात किरिल शेवचेन्कोवर 36 व्या चालीत मात केली. उपांत्यपूर्व फेरीच्या नियमित डावात शेवचेन्कोने पी. हरिकृष्णला बरोबरीत रोखले होते तर विदित गुजराथीला हरविले होते. युक्रेनने पहिली फेरी 2-4 अशी गमविली होती. त्यानंतर त्यांनी दुसऱया फेरीत भारताला 3.5-2.5 असे नमवित लढत ब्लिट्झ टायब्रेकवर नेली होती. उपांत्यपूर्वच्या दुसऱया फेरीत निहाल सरिनच्या जागी खेळणाऱया आर. प्रज्ञानंदने भारताला पहिला विजय मिळवून दिला. त्याने पांढऱया मोहरांनी खेळताना प्लॅटन गॅल्पेरिनचा पराभव केला. त्याने केवळ 20 चालीत सामना संपवत आपले वर्चस्व दाखवून दिले. हरिकाने भारताची आघाडी वाढविताना नतालिया झुकोव्हाचा 32 चालीत पराभव केला. आनंदने इव्हान्चुकला बरोबरीत रोखत सलग दुसरा सामना अनिर्णीत राखला तर पी. हरिकृष्णच्या जागी खेळणाऱया विदित गुजराथीला किरिल शेवचेन्कोकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र 114 चालींच्या मॅरेथॉन लढतीत भारताच्या हम्पीला पराभव स्वीकारावा लागल्याने युक्रेनचा विजय निश्चित झाला. भारताची उपांत्य लढत अमेरिका व कझाक यांच्यातील विजयी संघाविरुद्ध होणार आहे.

निकाल ः उपांत्यपूर्व फेरी राऊंड 1-भारत विवि युक्रेन 4-2 (आनंद बरोबरी वि इव्हान्चुक, हरिकृष्ण बरोबरी शेवचेन्को, हम्पी बरोबरी ओस्माक, हरिका विवि बुक्सा, सरिन विवि गॅल्पेरिन, वैशाली विवि मारिया बर्डनीक). राऊंड 2-युक्रेन विवि भारत 3.5-2.5 (आनंद बरोबरी इव्हान्चुक, गुजराथी पराभूत वि. शेवचेन्को, हम्पी पराभूत वि. ओस्माक, हरिका विवि नतालिया झुकोव्हा, प्रज्ञानंद विवि गॅल्पेरिन, वैशाली पराभूत वि. बर्डनीक). टायब्रेकöभारत विवि युक्रेन 5-1 (गुजराथी बरोबरी इव्हान्चुक, अधिबन विवि शेवचेन्को, हम्पी बरोबरी ओस्माक, हरिका विवि बुक्सा, सरिन विवि गॅल्पेरिन, वैशाली विवि बर्डनीक).

Related Stories

ब्रिटीश ग्रां प्रि शर्यत प्रेक्षकविना होणार

Patil_p

निसटते पराभव हा पॅटर्न झाल्याची कुंबळेची खंत

Patil_p

‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून 80 लाखांचा निधी

Patil_p

स्वीसच्या फेडररचे विजयी पुनरागमन

Amit Kulkarni

जेव्हा यजुवेंद चहल क्रिकेटकडून पुन्हा बुद्धिबळाकडे वळतो!

Patil_p

स्विटोलिना, केर्बर, कोंटा पराभूत

Patil_p
error: Content is protected !!