तरुण भारत

बेंगळूर युनायटेडची मोहम्मेडनवर मात

इंडियन एअरफोर्स-सीआरपीएफ लढत पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था/कल्याणी

Advertisements

एफसी बेंगळूर युनायटेडने मोहम्मेडन एससीवर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवित डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धेत गट अ मध्ये आघाडीचे स्थान मिळविले.

या दोन्ही संघांनी याआधीच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पावसाळी वातावरणामुळे पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवणे शक्य झाले नाही. उत्तरार्धात 64 व्या मिनिटाला गोल नोंदवण्यात बेंगळूर युनायटेडला पहिले यश आले. थॉकचोम जेम्स सिंगने हा गोल नोंदवला. अखेरच्या टप्प्यात मोहम्मेडनने जोरदार प्रयत्न सुरू केले होते. पण बेंगळूर युनायटेडने आणखी एक गोल नोंदवून मोहम्मेडनच्या आशा संपुष्टात आणल्या. स्टॉपेज टाईममधील पाचव्या मिनिटाला बेंगळूरला पेनल्टी मिळाली आणि स्लोव्हेनियाच्या लुका माजसेनने त्यावर गोल नोंदवत बेंगळूरचे गटातील अग्रस्थानही निश्चित केले. गट अ मधील इंडियन एअरफोर्स व सीआरपीएफ यांच्यातील लढत मुसळधार पावसामुळे खेळण्यायोग्य स्थिती नसल्याने रद्द करण्यात आली. या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

Related Stories

वऱहाडींच्या स्वागतासाठी मास्क, सॅनिटायझर अन् सोशल डिस्टन्सिंग!

Patil_p

ऑस्ट्रेलियन ओपनमधून डॉमिनिक थिएमची माघार

Patil_p

भारतीय नेमबाज पथक ऍम्स्टरडॅममध्ये दाखल

Patil_p

तबरेज शमसी राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध

Patil_p

ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड ऑगस्टमध्ये

Patil_p

जोकोविचची एटीपी कपमधून माघार

Patil_p
error: Content is protected !!