तरुण भारत

कबूतरांच्या लक्झरी लाइफवर लाखोंचा खर्च

एसी रुम, स्टायलिश कपडे, फिरण्यासाठी गाडीची सुविधा

अनेक लोकांना पाळीव प्राणी किंवा पक्ष्यांबद्दल प्रचंड आत्मियता असते. ते या प्राणी किंवा पक्ष्यांना घरच्या सदस्याप्रमाणे मानतात. पक्ष्यांवर प्रेम करणारी एक महिला सध्या चचेंत आहे. ही महिला स्वतःच्या कबूतरांवर एवढे प्रेम करते, त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करते.

Advertisements

या महिलेचे नाव मेगी जॉन्सन असून ती इंग्लंडच्या लिंकनशायर येथील रहिवासी आहे. मेगी यांनी कबूतरांसाठी एअरकंडिशन्ड बेडरुम, कपडय़ांचे कपाट आणि फिरण्यासाठी स्ट्रॉलर (मुलांना फिरविणारी गाडी)ची व्यवस्था केली आहे.

मेगी जॉन्सन यांना स्वतःची दोन्ही कबूतरं स्काय अणि मुसेबद्दल अत्यंत आत्मियता आहे. ही दोन्ही कबूतरं मेगी यांना एका ठिकाणी सापडली होती. मेगी यांनी त्यांना स्वतःच्या घरी आणले होते. कित्ये आठवडे मेगी यांनी या पक्ष्यांना स्वतःच्या हातांनी अन्न भरविले होते. दोन्ही पक्ष्यांवर त्या मुलांप्रमाणे प्रेम करतात.

या पक्ष्यांकडे स्वतःची बेडरुम देखील आहे. त्यांचे वेगवेगळे स्टायलिश कपडे तसेच सॉफ्ट खेळणी देखील आहेत. हे पक्षी लक्झरी आयुष्य जगतात, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येते. मेगी त्यांची देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते.

मेगी यांच्यानुसार त्यांचे हे दोन्ही पक्षी फॅशनेबल असून त्यांच्याकडे सुमारे 17 ड्रेस आहेत. प्रत्येक ड्रेसची किंमत अडीच हजारांपासून 3 हजारांदरम्यान आहे. मेगी त्यांना फिरण्यासाठी बाहेर नेते, तेव्हा ते उडण्याचा प्रयत्न करत नाहीत. या पक्ष्यांनाही मेगी यांचा सहवास आवडतो. महिन्याला 30 ते 40 हजार रुपये या कबूतरांकरता खर्च करत असल्याचे मेगी यांनी सांगितले आहे.

Related Stories

तैवानची कोरोनावर मात

tarunbharat

तालिबान्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे दिले वचन

triratna

चीनमध्ये आढळला नवा संसर्गजन्य आजार

datta jadhav

जपान : फुकुशिमाचे किरणोत्सर्गी पाणी समुद्रात सोडण्यास मंजुरी

datta jadhav

ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगावर आज मतदान

datta jadhav

पाऊस अन् हिमवृष्टीवर नियंत्रण मिळविणार चीन

Patil_p
error: Content is protected !!