तरुण भारत

3 दिवस गिर्यारोहण केल्यावर झाला विवाह

21 हजार 125 फुटांच्या उंचीवर विवाहबंधनात

स्वतःचा विवाहसोहळा संस्मरणीय करण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते, पण काही  मोजके लोकच हे स्वप्न साकार करू शकतात. अशाच लोकांपैकी एक आहेत पश्चिम बोलीवियाचे जॉनी पाचेको आणि हेदी पाको. या जोडप्याने कॉर्डिलेरा रियलमधील सर्वात उंच शिखर इलिमनीवर विवाह केला आहे.

Advertisements

हजारो फुटांच्या उंचीवर बंधनात

जॉनी पाचेको आणि हेदी पाको यांनी समुद्रसपाटीपासून 21 हजार 125 फुटांच्या उंचीवर पोहोचून विवाह केला आहे. तसेच जीवनाला विशेष क्षणाला संस्मरणीय केले आहे. विवाहादरम्यान जोडप्याने विशेष स्थितींमध्ये थंडीपासून वाचण्यासाठी गिर्यारोहकाचे हेल्मेट आणि पायांमध्ये स्टीलची स्पाइक्स परिधान केली होती.

3 दिवसांत पूर्ण केली चढाई

वधू आणि वर तसेच वरातीत सामील सदस्यांना बोलीवियाची राजधानी ला पाज येथून इलिमनी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी तीन दिवस लागले आहेत. या आयोजनाला यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. सजावट, भोजन आणि विवाहाची सामग्री शिखरावर पोहोचविण्याची जबाबदारी वरातीत सामील लोकांकडे सोपविण्यात आली होती. बॅकपॅकमध्ये 20 किलो अतिरिक्त वन जोडले गेले होते.

हवामानाने दिली साथ

या जोडप्याला निसर्गाचीही साथ मिळाली आहे. हवामान अनुकूल राहिले. विवाह सोहळा संपेपर्यंत उन्ह राहिल्याने यात सामील लोकांना विशेष त्रास झाला नाही. पण वधू-वरासमवेत सर्व लोकांनी खबरदारीदाखल पूर्ण तयारी केली होती.

Related Stories

अन् त्याने चक्क एअरपॉडस् गिळले…

Patil_p

ब्रिटिश प्रवाशांवर बंधने

Patil_p

कर्करोगग्रस्त आईला घडविणार जगाची सैर

Patil_p

न्यूयॉर्क : ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयातील वाघिणीला कोरोनाची लागण

prashant_c

कोरोना लसीसाठी जगभर जोरदार स्पर्धा

Patil_p

आफ्रिकेतून 2000 हून अधिक सैन्य मागे घेणार फ्रान्स

Patil_p
error: Content is protected !!