तरुण भारत

सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीत वरुण धवन

राज अन् डीके करणार दिग्दर्शन

अभिनेता वरुण धवन अमेझॉनची इंटरनॅशनल वेबसीरिज सिटाडेलच्या इंडियन स्पिन ऑफमध्ये दिसून येणार आहे. या वेबसीरिजची निर्मिती एव्हेंजर्सशी संबंधित रुसो ब्रदर्स करणार आहेत. तर राज आणि डीके याचे दिग्दर्शन करणार आहेत. ओरिजनल सिटाडेल एक ऍक्शन-ऍडव्हेंचर हेरगिरी सीरिज आहे. या सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडेन यांनी काम केले आहे.

Advertisements

सिटाडेल मेन सीरिज असून अन्य भाषांमध्ये याची सॅटेलाइट सीरिज सामील असेल. मुख्य सीरिज प्रियांका आणि रिचर्ड मॅडेन यांच्यावर ब्रिटनमध्ये चित्रित करण्यात येत आह. ही सीरिज जानेवारी 2022 मध्ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.

सिटाडेलचे लोकल प्रॉडक्शन भारत, मेक्सिको आणि इटलीत होणार असल्याचे समजते. सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीतील कलाकारांची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. या सीरिजचे चित्रकरण पुढील वर्षापासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर वरुण धवनने अलिकडेच अमर कौशिक यांच्या भेडिया तसेच राज मेहता यांच्या जुग जुग जियो या चित्रपटांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे.

Related Stories

‘अन्य’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

tarunbharat

मनोज वाजपेयींच्या ‘रे’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

खिसाच्या दिग्दर्शकाची प्रेरणादायी कहाणी

Patil_p

‘आश्रम’ वेब सिरिज वादाच्या भोवऱ्यात

Rohan_P

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना कोरोना; कुटुंबालाही लागण

Rohan_P

केंद्राच्या कृषी अध्यादेशाला स्थगिती

triratna
error: Content is protected !!