तरुण भारत

उदयनराजे व झेडपी अध्यक्ष कबुले यांच्या भेटीची चर्चा

कबुले आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

जिल्हय़ात सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक व सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी जलमंदिर पॅलेसवर जावून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जल मंदिर पॅलेसवर झालेली उदयनराजे व कबुले यांची भेट विकासकामांवर झाली असल्याचे बोलले जात असले तरी या भेटीमागे जिल्हा बँकेचे काही समीकरण दडले आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.  जिल्हय़ात सध्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे घमासान सुरु असून त्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे साताऱयात मेळावे घेवू लागले आहेत. बँकेच्या निवडणुकीत कोण कोणावर मात करणार याची गणिते बांधली जावू लागली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचा उजवा हात असलेले आणि अपक्ष निवडून येऊन सुद्धा त्यांना राष्ट्रवादीने जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलेले उदय कबुले मंगळवारी जलमंदीर पॅलेसवर दाखल झाले.

त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन विकासकामांवर चर्चा केली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी असे नवीन समीकरण तयार होणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

triratna

स्वराज्य भूमीतून मावळ्यांचे पानिपतला प्रस्थान

datta jadhav

अजिंक्यताऱ्याच्या साक्षीने रेकॉर्ड अजिंक्य डॉ. संदीप काटे यांनी संकल्प केला पुर्ण

triratna

सातारा जिल्हा परिषदेचे कर्मचारी देणार 55 व्हेटींलेटर बेड

triratna

उचगाव मणेरमळा येथे आढळला कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

triratna

कराड पालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा

Patil_p
error: Content is protected !!