तरुण भारत

जिजाबाआण्णा जाधव यांनी समाजाला दिशा दिली

सहकार महर्षि जिजाबाआण्णा जाधव यांची जयंती साजरी

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सहकार महर्षी जिजाबाआण्णा हे राजकारण, समाजकारणातील आदर्श व्यक्तीमत्व होते. त्यांनी समाजाला दिली. त्यांचा मिळालेला सहवास, आदर्शातून आम्हाला शिकायला मिळाले. त्यांचा आदर्श गोवे गावातील विविध संस्थांनी पुढे चालवला असून सौरऊर्जा विद्युत, शुद्ध पेयजल प्रकल्पाचे व व्यायामशाळा, कला वर्ग, अटल लँब, इंडोअर गेम हॉल हे भावी पिढय़ांना उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांनी केले. 

गोवे, ता. सातारा येथील कोटेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोवे ता. सातारा येथे सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव यांच्या 93 वी जयंतीचा कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी मदनदादा भोसले, आमदार महेशदादा शिंदे यांच्या हस्ते सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विकासकामांची पाहणीही केली.

प्रास्ताविक भुजंगराव जाधव यांनी केले. यावेळी गोवे गावच्या नवनियुक्त तलाठी पल्लवी बोंडे, कृषी समन्वयक रमेश जाधव यांचा तसेच विद्यालयाचे देणगीदार सत्यप्रसाद जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास कोटेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदाभाऊ जाधव, सचिव तुकाराम जाधव साहेब तज्ञ संचालक भुजंगराव जाधव, स्मारक समितीचे सचिव हणमंतराव चवरे, प्राचार्या साबळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गोवे गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सहकारमहर्षी जीजाबा आण्णा जाधव यांच्या जयंतीनिमित्त श्री कोटेश्वर विद्यालयात वक्तृत्व,निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन जगताप यांनी केले. बरकडे यांनी आभार मानले.  

 यावेळी आमदार महेशदादा शिंदे म्हणाले की, सहकार महर्षी जिजाबा आण्णांचे शैक्षणिक व सामाजिक प्रगतीच्या विचारांची व कार्याची समाजाला नितांत गरज आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्यात्मक ज्ञानाची सध्या गरज आहे. तसेच विद्यालयास आवश्यक असणाया इंडोअर गेम हॉलसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू असे सांगितले.

Related Stories

मांढरदेव घाटात दरड कोसळली

Patil_p

पोवईनाक्यावरचा प्रवास ठरतोय जीवघेणा

Amit Kulkarni

डॉ. राजेश जाधव यांनी विकसित केला ‘ऑक्सिजन प्लांट’

datta jadhav

लालपरीला पहिल्या दिवशी प्रवाशांचा थंडा प्रतिसाद

Patil_p

जिल्हय़ाला ‘निसर्ग’चा तडाखा

Patil_p

सिंहांच्या कार्यालयात बिबट्या आल्याने खळबळ

datta jadhav
error: Content is protected !!