तरुण भारत

कोरोना रुग्णसंख्येतील घट कायम

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येतील घट मंगळवारी देखील कायम असल्याचे दिसून आल़े कोरोनाचे 68 नवे रुग्ण मिळून आले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाल़ी उपचारातील रुग्णसंख्या 902 इतकी असून केवळ 338 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आह़े

Advertisements

  जिल्हात मंगळवारी एकूण 3 हजार 54 कोरोना चाचण्या झाल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 429 चाचण्यांपैकी 28 तर ऍन्टिजेन टेस्टच्या 2 हजार 625 पैकी 40 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये दापोली 7, खेड 2, गुहागर 5, चिपळूण 22, संगमेश्वर 4, रत्नागिरी 16, लांजा 5 तर राजापूर 7 असे तालुकानिहाय रुग्ण मिळून आले. जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77 हजार 61 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 6.53 इतका आह़े

  मंगळवारी दापोलीमधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 71 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 408 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.26 इतके आह़े तर 902 रुग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 338 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़

   एकूण रुग्ण -77061

नवे रुग्ण -68

   एकूण मृत्यू -2374

   मृत्यू – 1

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत आ. योगेश कदम घेणार पंचायत समितीची आढावा बैठक

triratna

रत्नागिरी : एलईडी व पर्ससीनच्या विरोधात दापोलीत मच्छिमारांचे बेमुदत साखळी उपोषण

triratna

किसान क्रेडिट कार्डचा 303 मच्छीमारांनी घेतला लाभ

NIKHIL_N

भडगाव मार्गावर कचऱयाच्या दुर्गंधीने नागरिक हैराण

Patil_p

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कार्यभार स्वीकारला

NIKHIL_N

रत्नागिरीच्या वैष्णवी श्रीनाथने फडकावला `कळसुबाई’वर तिरंगा !

triratna
error: Content is protected !!