तरुण भारत

पेडणे तालुक्मयातील पाच दिवासांच्या गणपतींचे थाटात विसर्जन

प्रतिनिधी /पेडणे

पेडणे तालुक्मयातील पाच दिवासांच्या गणपतींचे थाटात विसर्जन करण्यात आले. यंदा महागाई तसेच कोरोना आणि पावसाचे सावट चतुर्थी सणावर राहिले. पेडणे तालुक्मयातील विविध  भागातील मोठय़ा  प्रमाणात  गणपती  पाच दिवसांचे होते. करोना संकट असूनही आपल्या गणपती बाप्पाची भक्तीभावे सेवा भाविकांनी करत राञी आपल्या भागातील पारंपरिक गणपती विसर्जन स्थळी गणपतीचे विसर्जन करत आपल्या बाप्पाला निरोप दिला .

Advertisements

पेडणे तालुक्मयातील तोरसे, उगवे , पोरस्कडे ,  पेडणे पालिका क्षेत्रातील वाडय़ावरील तसेच खारेबांध , पराष्टे,  कोनाडी ,  देवसू  माईण,  मानशी , भालखाजन पालये, केरी ,  आदीनी तेरेखोल नदी किनारी भागातील भाविकांनी तेरेखोल नदीपाञात गणपतींचे विसर्जन केले.

तर ज्या भाविकांना नदी जवळ नाही त्यांनी ओहळात तसेच वाडय़ावरील  तळीमध्ये  गणपती विसर्जन  केले. हरमल , मांदे, मोरजी या समुद्र किनारी  भागातील भाविकांनी समुद्रात गणपतींचे विसर्जन केले. तुये , पार्से  इब्रामपूर  ,चांदेल, हसापूर , वारखंड , हणखणे आदी भागातील नागरिकांनी ओहळाच्या पाञता तय काहीनी  तळीमध्ये गणपतींचे विसर्जन केले.

पेडणे तालुक्मयातील काही  भागामध्ये चतुर्थी सणा दराम्यान आजारापणात भाविकांच्या घरातील कुटुंबियाचे निधन झाल्याने पाच दिवस दरवषी असणाऱया गणपतींचे विसर्जन तातडीने केले.

यंदा फटाक्मयाचा कमी प्रमाणात वापर

यंदा गणपती भाविकांनी खूपच कमी प्रमाणात फटाके फोडले. कोरोनाचे संकट तसेच पाऊस आणि वाढते फटक्मयाचे दर यामुळे खूपच कमी प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. पावसामुळे भाविकांमध्ये म्हणावा तितका जोश नव्हता.

Related Stories

सीरमकडून 32 हजार लसी दाखल

Omkar B

प्रतिष्ठित माणसामुळे सुसंस्कृत समाज घडतो

Patil_p

दुरुस्ती विधानसभेतच होणे आवश्यक

Omkar B

कृषीसाठी गोव्याने इस्रायलची मदत घ्यावी

Patil_p

फोंडय़ाचे पितापुत्र ‘रवी-रितेश’ कोरोनाबाधित

Patil_p

बेकायदेशीर घरांचीही होणार कर वसुली

Omkar B
error: Content is protected !!