तरुण भारत

पाच दिवशीय गणपती बाप्पाला निरोप

प्रतिनिधी /पणजी

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या तसेच अन्य गजराने पाच दिवशीय गणेशमूर्तीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. कोविड महामारीमुळे यंदाच्या चतुर्थी उत्सवावर परिणाम झाल्याचे आढळून आले त्यात अधिकतर गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या उत्सवावर समाधान मानले. यंदा चतुर्थीचा पाचवा दिवस मंगळवार होता. त्यातल्यात्यात मूळ नक्षत्र त्यामुळे काहीजणांकडे गौरी बसवण्याचा कार्यक्रम होता. अशात पाचव्या दिवशी आणि तेही मंगळवारी गणेश विसजंन अयोग्य वाटल्याने काहीजणांनी आपला उत्सव पाच दिवसांवरून सात दिवस ठरवला. त्यामुळे पाचव्या दिवशी वार्षिक पाच दिवशीय उत्सवी मूर्तीच विसर्जनासाठी आल्याचे दिसून आले.

Advertisements

श्री गणपतीला मुळांची शिदोरी विसर्जनावेढी गणपतीला शिदोरी म्हणून कराणे, चिने आदी मुळांची भाजी दिली जाते. ही शिदोरी जमिनीत पुरली जाते व सोबत आणलेले पंचखाद्य उपस्थितांमध्ये वाटले जाते. विसर्जनास आलेल्या प्रत्येकाच्या हातावर पंचखाद्य नैवेद्य ठेवताना दिसत होते. यंदा फटाक्यांची आतषाबजीही कमी दिसून आली. पावसाने दडी मारल्याने विसर्जनावेळी अधिक उत्साह दिसत होता.

Related Stories

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीधारकांना सुरक्षा कवच

Amit Kulkarni

चंदेरी सुंदरी राणी स्पर्धेत सानिशा, बॅनेट बनल्या विजेत्या

Patil_p

कारोना : 1055 बाधित, 32 बळी

Amit Kulkarni

दोन अट्टल गुन्हेगाराना साळगाव येथे अटक

Amit Kulkarni

लॉकडाऊन’ वाढविण्यास भाजप आमदारांची मान्यता

Patil_p

श्रीपादभाऊंच्या प्रकृतीत चांगली सुधारणा

Patil_p
error: Content is protected !!