तरुण भारत

ईश्वर अल्ला तेरो नाम…

लक्षतीर्थमधील नुरानी दाम्पत्याकडून गणेशाची प्रतिष्ठापना, हिंदू-मुस्लिम ऐक्याची घडवले दर्शन

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

ईश्वर आणि आल्ला एकच आहे, असा संदेश देत लक्षतीर्थ वसाहतमधील आसिम आणि शिराज नुरानी हे दाम्पत्ये गेल्या सहा वर्षापासून गणेशाची प्रतिष्ठापना करत आहेत. गणपतीची भक्तीभावे आणि विधीवत पूजा करत त्यांनी पुरोगामी कोल्हापुरात पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

कोल्हापुरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची अनुभूती अनेक वेळा आली आहे. लक्षतीर्थ वसाहतमधील नुरानी कुटुंब हिंदू धर्मियांचे सर्व सण मोठया उत्साहात साजरे करत आहेत. यामधून हिंदू-मुस्लिम ऐक्य़ अधोरेखित केले. आसिम नुरानी यांनी त्यांच्या शेजाऱयांकडे गणेशाची प्रतिष्ठापना पाहीली. त्यांनीही त्यांचे पती शिराज नुरानी यांच्याकडे आपणही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुया अशी इच्छा व्यक्त केली. पती शिराज यांनी पत्नीला लगेच होकार दिला. गेल्या सहा वर्षांपासून हे कुटुंब गणेशाची प्रतिष्ठापना करत आहे. शेजाऱ्यांकडे होणारे सर्व विधी पाहून गेली पाच दिवस नुरानी दाम्पत्याने गणरायाची मोठया भक्तिभावाने सेवा केली. मंगळवारी त्यांनीही त्यांच्या लाडक्या बाफ्पाचे विधिवत पूजन करुन निरोप दिला. यामधून नुरानी दाम्पत्याने जाती-धर्माचा भेदभाव न करता एक माणूस म्हणून भारत देश एकवटला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

Related Stories

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

triratna

कोडोलीत दिव्यांग, निराधारांना दिवाळी फराळाचे वाटप

triratna

कोल्हापूर : सामाजिक कार्यकर्ता भोरे मृत्यु प्रकरणी आजी – माजी मुख्याधिकाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा

triratna

पानसरे हत्या प्रकरण : अंदूरे व कुरणेच्या जामीन अर्जावर २१ ऑगस्टला सुनावणी

triratna

लंगडी बाजू सावरण्यासाठीच राजू शेट्टींचा प्रयत्न : नाराजी ऐवजी शुद्धीकरण महत्वाचे

triratna

विद्यार्थ्यांनी जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा : कुलगुरू शिर्के

triratna
error: Content is protected !!