तरुण भारत

जेईईच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 18 विद्यार्थ्यांनी मिळवला रँक 1

ऑनलाईन टीम / मुंबई :

इंजिनिअरींग प्रवेश परीक्षा जेईई मेनच्या चौथ्या सत्राचे निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केले. या परीक्षेत 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत, तर 18 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही परीक्षा चार सत्रात घेण्यात आली होती. फेब्रुवारीत पहिले सत्र, मार्चमध्ये दुसरे सत्र, तिसरं सत्र 20-25 जुलैला तर चौथं सत्र 26 ऑगस्टपासून 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आले होते. सत्र 1 मध्ये एकूण 6.61 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते, सत्र 2 मध्ये 6.19 लाख उमेदवार, सत्र 3 मध्ये 7.09 लाख तर सत्र 4 साठी एकूण 7.32 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 18 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळाले आहेत.

जेईईई मेन 2021 ला बसलेले विद्यार्थी त्यांचे निकाल पाहण्यासाठी jeemain.nta.nic.in, nta.ac.in आणि ntaresults.nic.in  या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.

Related Stories

जितेंद्र आव्हाडांच्या संकल्पनेतून कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

triratna

म्युकरमायकोसिस : 18 राज्यात 5424 रुग्ण

datta jadhav

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Rohan_P

देशात 31,522 नवे कोरोना रुग्ण; 412 मृत्यू

Rohan_P

बिहारमध्ये 264 कोटींचा सेतू 29 दिवसांतच गेला वाहून

Patil_p

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

triratna
error: Content is protected !!