तरुण भारत

पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या वेतनात 250 टक्के वाढ

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :

पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंच्या वेतनात तात्काळ 250 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ज्या खेळाडूंचे मासिक वेतन 40 हजार रुपये होते. त्यांच्या वेतनात एक लाख रुपयांची वाढ होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काही तासातच रमीझ राजा यांनी यासंदर्भात घोषणा केली.

Advertisements

रमीज राजा म्हणाले, पाकिस्तानातील 192 देशांतर्गत खेळाडूंच्या वेतनात तात्काळ 1 लाख रुपयांची वाढ होईल. वेतनवाढ झाल्यामुळे प्रथम श्रेणी आणि ग्रेड स्पर्धांमधील खेळाडू प्रत्येक महिन्याला 1 लाख 40 हजार ते 2.5 लाख रुपये कमवू शकणार आहेत. अ श्रेणी खेळाडूंना 13.73 लाखांऐवजी 14.75 लाख, ब श्रेणी खेळाडूंना 9.37 लाखांऐवजी 10.37 लाख तसेच क श्रेणी खेळाडूंना 6.87 लाखांऐवजी 7.87 लाख रुपये वेतन मिळेल.

Related Stories

ब्रिटनमधील टाळेबंदी सुरूच राहणार

Patil_p

अन् चीनमध्ये उंट ट्रॉफिक सिग्नल

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 95 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी, मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन

triratna

1 हजार प्रेयसी असणाऱया धार्मिक नेत्याला 1,075 वर्षांची शिक्षा

Patil_p

फ्रान्समध्ये पुन्हा देशव्यापी कर्फ्यू

datta jadhav
error: Content is protected !!