तरुण भारत

आरसीयूमध्ये रंगतोय सापशिडीचा खेळ

परीक्षांच्या खेळखंडोब्यावरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू)मध्ये सध्या परीक्षांच्या तारखांवरून सापशिडीचा खेळ सुरू आहे. विद्यापीठात कुलगुरु तसेच इतर प्रशासकीय अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला बसत असल्याचा आरोप विद्यार्थी व पालक करीत आहेत. परीक्षांच्या तारखांमध्ये सतत बदल केला जात असल्याने विद्यार्थी संभ्रमात असून, यामध्ये  उच्च शिक्षण विभागाने हस्तक्षेप करून कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात आल्या. त्यानंतर केवळ 20 दिवसांमध्येच पुढील सेमीस्टरच्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तितकासा वेळ मिळाला नाही. लगेच परीक्षा लागल्याने मानसिक ताणही वाढला आहे. त्यामुळे दोन सेमीस्टरच्या परीक्षांमध्ये किमान महिन्याभराचे तरी अंतर असणे आवश्यक आहे. परंतु विद्यार्थ्यांचा विचार न करता विद्यापीठ प्रशासनाकडून मनमानी कारभार केला जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे.

केपीएससी-सेमीस्टर परीक्षा आल्या एकत्रच

आरसीयूकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना बऱयाचवेळा इतर बाबींचा विचारच केला जात नाही. बऱयाचवेळा सैन्यभरती, केपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांच्या दिवशीच विद्यापीठाकडून परीक्षांचे आयोजन केले जात आहे. यामुळे विद्यार्थी यातील एका परीक्षेला अर्ज करून पैसे भरूनदेखील मुकत आहेत. त्यामुळे इतर परीक्षांचा विचार करूनच परीक्षांचे नियोजन करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर उघडले डोळे

अभ्यासासाठी वेळच मिळालेला नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी सोमवारी भुतरामहट्टी येथे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आत्मदहनाचा इशारा देत विद्यार्थ्यांनी आंदोलन करताच विद्यापीठाने परीक्षा चार दिवसांसाठी पुढे ढकलल्या. हे दरवेळचेच झाले असल्याने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधींचा अभिप्राय घ्यावा -रोहित उमनाबादीमठ (शहर सेपेटरी-अभाविप)

काही दिवसांपूर्वीच मागील सेमीस्टरच्या परीक्षा झाल्या असून, अचानक पुढील सेमीस्टरच्या परीक्षा आरसीयूने जाहीर केल्या. परंतु याच कालावधीत केपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱया परीक्षाही होणार आहेत. पदव्युत्तरचे अनेक विद्यार्थी या परीक्षांना बसले असल्याने यातील एका परीक्षेला ते मुकणार असल्याने विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी विद्यार्थी प्रतिनिधींचा अभिप्राय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पदवी परीक्षा वेळापत्रकात बदल

केपीएससी परीक्षांसाठी बदलले वेळापत्रक

राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) ने पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. दि. 18 व 19 सप्टेंबर रोजी केपीएससीच्या परीक्षा होणार असल्यामुळे त्या दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे.

अभ्यासक्रमाचे नावपरीक्षा तारीखपुढे ढकलण्यात आलेली परीक्षेची तारीख
बी. ए.18/9/2103/10/21
19/9/2104/10/21
बी. कॉम18/9/2128/9/21
19/9/2129/9/21
बीएससी18/9/2104/10/21
19/9/2105/10/21
बीएससी (सीएस)18/9/2123/9/21
बी.एस.एस. टी.18/9/2125/9/21
19/9/2126/9/21
बीएसडब्ल्यू18/9/2124/9/21
19/9/2125/9/21
बीबीए18/9/2124/9/21
19/9/2125/9/21
बीसीए18/9/2122/9/21
19/9/2123/9/21

Related Stories

काकतीमध्ये 72 टक्के मतदान

Patil_p

भावाच्या मृत्यू पाठोपाठ दोन बहिणींही सोडले प्राण

Patil_p

पृथ्वी निरलगीमठ याचे चमकदार यश

Amit Kulkarni

एपीएमसीत कवडीमोल दराने भाजीची विक्री

tarunbharat

महिला आघाडीतर्फे फराळ स्टॉलचे उद्घाटन

Amit Kulkarni

जेष्ठ सर्वोदयी स्वातंत्र्यसैनिक सदाशिव बापूसाहेब भोसले यांचे दुःखद निधन

Amit Kulkarni
error: Content is protected !!