तरुण भारत

पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप

‘पुढच्या वषी लवकर या…’ : कपिलेश्वर तलावात घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरात मोठय़ा उत्साहाने गणेशोत्सव सण साजरा केला जातो. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सणावर बंधणे आली आहेत. पाच दिवसांचा सण साजरा करावा, अशी सूचना शासनाने केली होती. याची दखल घेत काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन पाचव्या दिवशी भक्तिभावाने  ‘पुढच्यावषी लवकर या…’ असे म्हणत करण्यात आले.

गणेशोत्सव म्हटले की, बेळगावकरांच्या आनंदाला उधाण येते. पुणे, मुंबईच्या धर्तीवर शहरात गणेशोत्सव साजरा केला जातो. सलग 11 दिवस विविध उपक्रम, सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. तसेच विविध प्रकारची आकर्षक आरास सजविली जाते. मात्र सलग दुसऱया वषी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव सणात अडचण निर्माण झाली आहे. शहरात 350 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस गणेशोत्सव साजरा करावा, अशी सूचना राज्य शासनाने केली होती. मात्र अकरा दिवस गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली होती. त्यामुळे शासनाने परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या नियमावलीचे पालन

काही मंडळांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करीत गणेशोत्सव साजरा केला आहे. विशेषतः पाचव्यादिवशी सरकारी कार्यालयातील गणेशमूर्तींचे तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे मंगळवारी शहरातील विसर्जन तलावावर घरगुतीसह सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बीएसएनएल कार्यालयातील गणेशमूर्ती, खासबाग येथील व्यापारी बंधू, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी श्रीमूर्तीचे विसर्जन केले. तसेच काही गणेशोत्सव मंडळांनी पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करताना कोरोनाचे विघ्न दूर व्हावे, अशी मागणी केली.

गौरींनी घेतला माहेरचा निरोप

दोन दिवसांचा मन तृप्त करणारा पाहुणचार घेऊन घरोघरच्या गौरींनी मंगळवारी आपल्या माहेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेली महिलांची लगबग काहीशी थांबली आणि घर सुने वाटू लागले. मंगळवारी सकाळी गौरीचे दोरे बांधून घेण्याची प्रथा महिलांनी पूर्ण केली. भाद्रपदमध्ये गौरीच्या पोटात ठेवलेले दोरे (धागे) काढून गौरीसमोरील हारामधील फुले, तुळशी घालून ते गुंफण्यात आले आणि महिलांनी ते परस्परांना बांधले. यामध्ये मुलाचे, पतीचे असे दोरे बांधले जातात.  त्यानंतर गारवा म्हणून गौरीसाठी केलेला दही-भात, पाटवडी (झुणक्मयाची वडी) यासह शुक्रवारी स्वयंपाकातील काही पदार्थांसह महिलांनी सहभोजन केले.

Related Stories

घरोघरी जावून तपासणी करण्याची मोहीम सुरूच

Amit Kulkarni

दूथ्लॉन रन सायकल स्पर्धा रविवारी

Patil_p

वृत्तपत्र वाचक संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ

Patil_p

चुडाप्पा हलगेकर कुस्ती समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान

Patil_p

आजपासून बँकांचे व्यवहार दुपारी 2 पर्यंतच सुरू

Amit Kulkarni

बेळगावमध्ये उभारले जातेय ‘हायटेक रेल्वेस्थानक’

Patil_p
error: Content is protected !!