तरुण भारत

नुकसानग्रस्त शेतीच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात

3 हजार 726 शेतकऱयांचे नुकसानभरपाईसाठी अर्ज

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

जुलै महिन्यादरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील बहुतांश तालुक्मयांमध्ये शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन, ऊस, तूर, उडीद, कापूस, ज्वारी, मका आदी पिकांना फटका बसला आहे. दरम्यान जिल्हय़ातील फळबागांनादेखील फटका बसला आहे. साधारण 3 हजार 741 बागायत पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान 3 हजार 726 शेतकऱयांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल केले आहेत. या शेतकऱयांची डाटा एन्ट्रीमध्ये नोंद झाली आहे. उर्वरित शेतकऱयांच्या नेंदी केल्या जात आहेत.

 शेतकऱयांकडून नुकसानग्रस्त शेतीचे फोटो, सातबारा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड व इतर कागदपत्रांसह नोंदणी केली गेली आहे. दरम्यान ग्राम पंचायत, तलाठय़ाच्या साहाय्याने नुकसानग्रस्त शेतीचा सर्व्हे करण्यात आला आहे. नोंद झालेल्या शेतकऱयांच्या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात नुकसानग्रस्तांना भरपाई मिळणार आहे.

  मागील तीन वर्षांपासून जिल्हय़ात महापूर येत असल्याने शेतकऱयांना मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागत आहे. सलग तीन वर्षांपासून नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पिकांबरोबर जमिनीचेही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून भरीव मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

हंगरगे गावात कडक लॉकडाऊनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

हिरा परमेकर यांना बेळगाव समाज भूषण पुरस्कार

Omkar B

रोटरी क्लबतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप

Amit Kulkarni

सदाशिव आयोगाला मान्यता द्या

Patil_p

कर्नाटक: टिकेनंतर टीपू सुल्तानचा ७ वी च्या अभ्यासक्रमात पुन्हा समावेश

triratna

बेळगावची कन्या ठरली ‘मिस कर्नाटक’

Patil_p
error: Content is protected !!