तरुण भारत

आरटीपीसीआर नसणाऱया चौघांना अटक

कर्नाटकात प्रवेश करणाऱयांवर निपाणी ग्रामीण पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /निपाणी

Advertisements

कर्नाटकात प्रवेश करणाऱयांना आरटीपीसीआर रिपोर्ट सक्तीचा करण्यात आला आहे. असे असतानाही रिपोर्ट सोबत न ठेवता कर्नाटकात प्रवेश करू पाहणाऱयांवर निपाणी ग्रामीण पोलिसांनी कारवाई करीत चौघांना अटक केली. याप्रकरणी 2 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत तर इतर 16 जणांची चौकशी करण्यात येत आहे.

मंगळवारी पहाटे 5 वाजता पोलिसांच्या गस्त पथकाला चुकवून मांगूर फाटा येथून महाराष्ट्रातील काहीजण 2 वाहनांतून आरटीपीसीआर रिपोर्ट नसताना कर्नाटकात प्रवेश करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयित वाहनांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली. यातील एका वाहनामध्ये 11 तर दुसऱया वाहनामध्ये 9 प्रवाशी होते. मात्र यापैकी एकाकडेही आरटीपीसीआर रिपोर्ट नव्हता. त्यामुळे सर्वांना पोलीस स्थानकात आणण्यात आले.

वरीलपैकी वामन गोविंद सोनकांबळे (वय 52, रा. लातूर), लहु शंकर लांडगे (वय 25, रा. लातूर), योगेश शिवाजी कोणे (वय 21, रा. हुबळी) व नितीन कृष्णात गोडय़ाप (वय 27, रा. कुर्ली, ता. निपाणी) या चौघांना आयपीसी 420, 260, 270, 271, 352 नुसार अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

Related Stories

फ्रुटमार्केट खुल्या मैदानात स्थलांतराची सूचना

Amit Kulkarni

श्री कपिलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी विश्वस्त मंडळ कार्यरत

Patil_p

प्रभारी आहे म्हणून कामात दिरंगाई नको

Amit Kulkarni

मलप्रभेवरील यडोगा बंधाऱयाला वाली कोण?

Patil_p

कडोली साहित्य संमेलन 10 रोजी साधेपणाने होणार

Patil_p

साई कॉलनी गणेशोत्सव मंडळातर्फे कृत्रिम तलावाची सोय

Patil_p
error: Content is protected !!