तरुण भारत

मुतकेकर ज्वेलर्समधून 4 कोटी 3 लाखाचे सोने लंपास

खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद, 6 जणांवर चोरीचा गुन्हा दाखल : बेळगाव परिसरात खळबळ

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

खडेबाजार येथील मुतकेकर ज्वेलर्समधील 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरल्याची फिर्याद खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. या घटनेमुळे बेळगाव परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

खडेबाजार येथील मुतकेकर ज्वेलर्समधील अरविंद मुतकेकर यांच्यासह सहा जणांनी 4 कोटी 3 लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची फिर्याद संपदा अनिरुद्ध वैद्य (रा. ठाणे, मुंबई) यांनी खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये दिली आहे. संपदा यांचे वडील अनिल हे मयत झाल्यानंतर खडेबाजार येथील मुतकेकर ज्वेलर्स दोन्ही दुकानांची चावी अरविंद मुतकेकर यांच्याकडे होती. तेच संपूर्ण व्यवहार सांभाळत होते.

त्यानंतर एका दुकानाची चावी अरविंद मुतकेकर यांनी संपदा वैद्य यांच्याकडे दिली. मात्र काही दिवसांनंतर अचानकपणे ते दुकान खोलून त्यामधील 4 कोटी 3 लाख रुपये किमतीच्या सोन्यासह रक्कम लांबविल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. अरविंद मुतकेकर यांच्यासह मंदार सदानंद मुतकेकर, तनया पोवले, सचिन उर्फ गणेश पोवले, राजू नवाले, नितीन नंद्याळकर यांनी ही चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खडेबाजार पोलिसांनी या सर्वांवर भादंवि 120-बी, 378, 420, 467, 468, 470, 471 अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

सर्वांचे पलायन

या घटनेनंतर या सर्वांनी पलायन केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मयत अनिल मुतकेकर यांच्या मुली संपदा, पद्मश्री आणि ऐश्वर्या यांचे हे दुकान आहे. मात्र या दुकानामध्ये चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

मोबाईल नेटवर्कविना अलतगावासियांची गैरसोय

Amit Kulkarni

क्लब रोडवरील पथदीप दिवसा सुरू अन् रात्री बंद..

Amit Kulkarni

ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अनंत मनोहर यांचे निधन

Amit Kulkarni

येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात

Amit Kulkarni

वैजनाथ देवस्थानची दवणा यात्रा रद्द

Amit Kulkarni

शिल्लक कामे 28 जानेवारीपर्यंत पूर्ण न केल्यास अधिकाऱयांचे निलंबन

Patil_p
error: Content is protected !!