तरुण भारत

असदुद्दीन ओवेसी भाजपाचे चाचाजान; राकेश टिकैतांचा हल्लाबोल

नवी दिल्ली/प्रतिनिधी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ ची रणधुमाळी आतापासूनच सुरु झाली आहे. बागपतमध्ये दाखल झालेल्या भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांनी आता एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान राकेश टिकैत हे दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी वारंवार भाजप सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या निमित्ताने सुरु झालेल्या राजकीय रणसंग्रामात ‘अब्बा जान’ नंतर आता ‘चाचाजान’ची एंट्री झाली आहे. कारण, यावेळी, राकेश टिकैत यांनी ओवैसी यांचा उल्लेख भाजपाचे ‘चाचाजान’ असा केला आहे. “भाजपाचे ‘चाचाजान’ ओवेसी आता उत्तर प्रदेशात आले आहेत. तेच भाजपला विजयाकडे घेऊन जातील. आता काहीच अडचण नाही”, असा टोला यावेळी टिकैतांनी लगावला आहे.

राकेश टिकैत यांनी “भाजपाचे चाचाजान असदुद्दीन ओवेसी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत. त्यामुळे, त्यांनी (ओवेसींनी) त्यांच्यावर (भाजपाला) अत्यंत कठोर शब्दांत जरी टीका केली तरीही त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला जाणार नाही. कारण, ते दोघेही एकाच टीममधील आहेत”, अशी थेट टीका राकेश टिकैत यांनी यावेळी केली आहे.

Advertisements

Related Stories

पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यांना यशस्वीतेचा ‘मंत्र’

Patil_p

अफगाणिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चाधिकार गट

Patil_p

इंधन दरवाढीचा भडका; मध्य प्रदेशात पेट्रोल 112 रुपये लिटर

Rohan_P

तिसरी लाट रोखण्यासाठी ‘मिशन हंड्रेड डेज्’

Patil_p

महाराष्ट्रात 10 वीचा निकाल 31 जुलैपर्यंत, तर 12 वीचा 15 ते 20 जुलै दरम्यान

Rohan_P

धोनीने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी : सुब्रमण्यम स्वामी

datta jadhav
error: Content is protected !!