तरुण भारत

लसीचे दोन्ही डोस घेऊनही २३ हजार जणांना कोरोनाची बाधा, BMC चा अहवाल

मुंबई /प्रतिनिधी

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे आरोग्य विभाग सांगत आला आहे. त्यानुसार संपूर्ण देशात लसीकरण मोहोइम सुरु झाली आहे. परंतु लसीचे दोन्ही डोस घेऊन पण अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. राजधानी मुंबईतही आतापर्यंत जवळपास वीस हजारांहून अधिक लसवंतांना कोरोनाची बाधा झालीय. मुंबईत झालेल्या एकूण लसीकरणापैकी ०.३५ टक्के लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली आहे. यामधील वृद्धांचं प्रमाण चिंतेत भर टाकणारं आहे.

मुंबईतल्या एकूण लसीकरणापैकी०.३५ टक्के लोकांना कोरोनाची पुन्हा बाधा होत आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांपैकी ३५०लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होत आहे, असं पालिकेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. पण नागरिकांनी लसीबाबत भीती बाळगू नये. अहवाल तयार करते वेळी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २५.३९ लाख होती. यापैकी ९००१ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे झालं. म्हणजेच लसीकरणानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण नगण्य आहे. मात्र यातही ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे, ही चिंता वाढवणारी आकडेवारी आहे.

Advertisements

Related Stories

ट्रम्प यांचे घूमजाव…

datta jadhav

बावेली रस्ता बनला अपघाताला निमंत्रण

triratna

शरद पवारांकरता प्रशांत किशोरांची मोर्चेबांधणी!

Patil_p

गुजरात मंत्रिमंडळात सर्व 24 नवे चेहरे

Amit Kulkarni

कर्नाटक : सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करणार नाही

triratna

माजी IG कुंवर विजय प्रताप यांचा ‘आप’मध्ये प्रवेश ; केजरीवाल म्हणाले…

Rohan_P
error: Content is protected !!