तरुण भारत

आता 5 दिवसात बरा होणार कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील पहिल्या अँटीव्हायरल औषधाचा शोध केंद्रीय औषध संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकाने लावला आहे. ‘उमिफेनोविर’ असे या औषधाचे नाव आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण केवळ पाच दिवसात बरे होणार असल्याचा दावा सीडीआरआयने केला आहे.

Advertisements

सीडीआरआयचे संचालक तपस कुंडू म्हणाले, 18 ते 75 वयोगटातील 132 कोरोना रुग्णांवर तीन टप्प्यात ‘उमिफेनोविर’ औषधाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. यामध्ये विना लक्षणे आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरले आहे. डेल्टा व्हेरिएंटविरोधातही हे औषध परिणामकारक ठरेल, अशी आशा आहे. रुग्ण बरे होण्यासाठी उमिफेनोविर 800 एमजीचा डोस दिवसातून दोन वेळा असा पाच दिवस घ्यावा लागेल. कोरोनाच्या उपचारात उमिफेनोविर गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित आहे. लवकरच उमिफेनोविर टॅबलेट आणि सिरपच्या रुपाने बाजारात येऊ शकते. त्याची किंमतही माफफ असेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

भोपाळ महानगरपालिका उत्तरप्रदेशातून करतेय डिझेलची खरेदी

datta jadhav

आंतरदेशीय दत्तकग्रहणासाठी नवे नियम

Patil_p

बालक 5 महिन्यांचे…इंजेक्शन 16 कोटीचे

Patil_p

आठ नव्या राज्यपालांची नियुक्ती

Patil_p

पंजाबमध्ये ब्लॅक फंगसचे 100 रुग्ण; आरोग्य मंत्री म्हणाले…

Rohan_P

कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव

Patil_p
error: Content is protected !!