तरुण भारत

संकटात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिलासा

नवी दिल्ली/प्रतिनिधी

संकटात असलेल्या दूरसंचार कंपन्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठा दिलासा दिला आहे. मंत्रिमंडळाने घातलेल्या निर्णयामुळे व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल सारख्या दूरसंचार कंपन्यांना फायदा होणार आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

पॅकेज अंतर्गत टेलिकॉम कंपन्यांचे स्पेक्ट्रम पेमेंट काही काळासाठी थांबवले जाण्याची शक्यता आहे. मदत पॅकेजमध्ये समायोजित सकल महसूल (एजीआर) संबंधित देयकावर चार वर्षांच्या स्थगितीचा समावेश असण्याची शक्यता आहे. दूरसंचार कंपन्यांवरील भार हलका होण्यासाठी या पॅकेजची मदत होणार आहे. व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांना मदत होणार आहे.

दरम्यान सकारत्मक बातमीमुळे व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. मुंबई शेअर बाजारात व्होडाफोन आयडियाचे शेअर्स २.६५ टक्क्यांनी, तर भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे.

Advertisements

Related Stories

देशातील कोरोना रूग्णसंख्या 19 लाखांवर

datta jadhav

रेल्वे सोडणार ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

Patil_p

उत्तराखंडात 580 नवे कोरोना रुग्ण; 15 मृत्यू

Rohan_P

राष्ट्रपतींकडून महिलांच्या सुरक्षेचा आणि सन्मानाचा संकल्प

tarunbharat

देशातील रूग्णसंख्या 37 हजार 412

Patil_p

भारतात पुनरागमनासाठी पबजीचा मोठा निर्णय

Patil_p
error: Content is protected !!