तरुण भारत

चोऱ्यांच्या सत्राने मारुतीनगर वासीय भयभीत

एका रात्रीत तीन घरे फोडली, ऐन गणेशोत्सवात गुन्हेगारांचा धुमाकूळ

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

चोऱया, घरफोडय़ांच्या सत्राने मारुतीनगर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. चोरटय़ांनी एका रात्रीत तीन घरे फोडली असून सुमारे 4 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज पळविले आहेत. ऐन गणेशोत्सवात गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू असून चोऱया थोपविण्यात पोलीस दल अपयशी ठरले आहे.

 बुधवारी सकाळी चोरीच्या या घटना उघडकीस आल्या आहेत. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे. एका माळमारुती पोलीस स्थानकात, पोलस व अधिकाऱयांत सुरू असलेल्या गटबाजीमुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून त्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

निवृत्त सैनिक अशोक कांबळे यांच्या तिसऱया क्रॉसवरील बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 2 लाख 20 हजार रुपये रोख रक्कम असे सुमारे 4 लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लांबविला आहे. अशोक कांबळे यांचा मुलगाही लष्करात असून तोही सुट्टीवर आला आहे. त्याचेही साहित्य चोरीला गेले आहे.

अशोक यांच्या घराजवळच असलेल्या श्रीधर माहीते यांचे घर फोडण्यात आले असून तेथून 5 तोळे चांदीचे दागिने व 35 हजार रुपये रोख रक्कम चोरटय़ांनी पळविले आहेत. श्रीधर हे ही गणपतीसाठी चव्हाट गल्ली येथील आपल्या मुळ घरी आले होते. गणपतीची पूजा आटोपून रात्री झोपण्यासाठी ते मारुतीनगरला येत होते. मंगळवारी ते चव्हाट गल्लीतच राहिले. चोरटय़ांनी हीच संधी साधून त्यांचे घर फोडले आहे.

याच परिसरातील आणखी एका बंद घराचा कडीकोयंडा तोडण्यात आला आहे. मात्र या घरात चोरटय़ांच्या हाती काहीच लागले नसल्याची माहिती मिळाली आहे. सध्या गणेशोत्सवामुळे आपल्या घरांना कुलुप लावून अनेक जण मुळ गावी गेले आहेत. त्याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत. अलिकडेच या घराची वास्तुशांती झाली होती. त्यामुळे घरात काही सामान ठेवण्यात आले नव्हते. एका रात्रीत तीन घरे फोडल्याच्या घटनांनी परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळून चोरीचा ऐवज जप्त करावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र माळमारुती पोलीस ही प्रकरणे किती गांभीर्याने घेणार, यावर तपासाची दिशा ठरणार आहे. कारण माळमारुती पोलीस स्थानकातील  गटबाजी वाढल्यामुळे अधिकाऱयांची पोलिसांवरील नियंत्रण सुटले आहे. याच परिस्थितीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत, अशी स्थिती आहे.

देशसेवा करणाऱया सैनिकांची घरेही असुरक्षित?

निवृत्त सैनिक अशोक कांबळे हे मुळचे हुक्केरी तालुक्मयातील सोलापूरचे. गणेशोत्सवासाठी गेल्या मंगळवार दि. 7 सप्टेंबर रोजी ते गावी गेले होते. त्यांचा मुलगाही लष्करी सेवेत आहे. सुट्टीवर येण्यापूर्वी त्याने आपला लगेज पाठविला होता. लगेज घेण्यासाठी अशोक सोलापूरहून बेळगावला आले होते. ते उतरवून घरात ठेवून सोमवार दि. 13 सप्टेंबर रोजी ते पुन्हा सोलापूरला गेले. मंगळवारी पाचव्या दिवशी त्यांनी आपल्या घरातील गणपतीचे विसर्जन केले. दोन दिवसांनी ते बेळगावला येणार होते. मात्र त्याआधीच चोरटय़ांनी त्यांच्या बंदघराचा कडीकोयंडा तोडून रोकड व दागिने पळविले आहेत. देशसेवा करणाऱया सैनिकांची घरेही बेळगावात किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Stories

हायव्होल्टेजमुळे समर्थनगरमध्ये लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

बागलकोट-कुडची रेल्वे महामार्गासाठी जमिनीचे संपादन पूर्ण करा

Patil_p

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

triratna

कल्लेहोळमध्ये वासरू प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे तिळगूळ समारंभ

Amit Kulkarni

मराठा बँक, जिजामाता बँकेच्या नूतन संचालकांचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!