तरुण भारत

बावेलीच्या खेळाडूंचे जयपूर युथ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश

म्हासुर्ली / वार्ताहर

जयपूर राजस्थान येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया युथ गेम्स चॅम्पियनशिपमध्ये बावेली ता.गगनबावडा गावातील उदयोन्मुख खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. तसेच श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युथ गेम स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघातून निवड झाली आहे.

१९ वर्षाखालील कबड्डी प्रकारात साहिल विश्वास म्हस्कर,रविंद्र अंकुश कदम यांनी सुवर्ण पदक पटकाविले, तर ४०० मी धावणे मध्ये स्नेहल सुरेश पारकर हिने सुवर्ण पदक मिळवले, तसेच ८०० मीटर धावणे मध्ये नितीन सदाशिव महाडेश्वर याने कास्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले. तसेच श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वांची निवड झाली आहे.सर्व खेळाडूंना प्रशिक्षक दिनकर वि.म्हस्कर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.यशस्वी खेळाडूंच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Advertisements

Related Stories

सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र उभारणीच्या जागेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

triratna

अफगाणिस्तानचा झिम्बाब्वेला दणका

Patil_p

अ.भा. फुटबॉल फेडरेशनची तंदुरुस्तीसाठी मोहीम

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

कोल्हापूर : पेठ वडगावात कोरोना रुग्णसंख्या १२५ वर

triratna

जेमीसनचे 5 बळी, अझहर अलीचे शतक हुकले

Patil_p
error: Content is protected !!