तरुण भारत

विनायक मेस्त्री यांना कला सन्मान पुरस्कार जाहिर

 ओटवणे / प्रतिनिधी:

    पुणे येथील आर्ट बिटस् फाऊंडेशनचा  आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार ओटवणे गावचे सुपुत्र तथा युवा दशावतारी कलाकार विनायक मेस्त्री यांना जाहिर झाला आहे. ओटवणेतील मेस्त्री घराण्याला तीन पिढ्यांपासून दशावतारी कलेचा वारसा लाभला असून विनायक मेस्त्री १९९५ दरम्यान विद्यार्थीदशेपासूनच गेली २६ वर्षे दशावतारी कलेत कार्यरत आहेत. त्यांचे राजाराम व सूर्यकांत मेस्त्री हे दोन्ही भाउही दशावतारी कलेत प्रसिध्द आहेत तर प्रसिद्ध ज्येष्ठ दशावतारी कलाकार कांता मेस्त्री हे त्यांचे वडील आहेत. विनायक मेस्त्री यांनी सुरुवातीची दहा वर्षे त्यांच्या बालगोपाळ दशावतार मंडळांमध्ये त्यानंतर महापुरुष, माऊली व हेळेकर दशावतार मंडळात प्रत्येकी चार वर्षे दशावतारी कलेत योगदान दिले.              ओटवणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असलेल्या विनायक मेस्त्री यांनी आपले काम सांभाळून दशवतारी क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नारदाच्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल विविध कला व सांस्कृतिक संस्थानी त्याच्या या कलेचा गौरव केलेला आहे. दशावतार कलेतील योगदानाची दखल घेऊनच विनायक मेस्त्री यांची कला सन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरांतुन अभिनंदन होत आहे.

Advertisements

Related Stories

शिरशिंगेत डोंगरातील पायऱयांना भेगा

Patil_p

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’

triratna

तब्बल पाच पथकांकडून तपासणी

NIKHIL_N

दोडामार्गातील ‘त्या’ युवतींना नीलेश राणेंकडून मदत

NIKHIL_N

कलिंगड स्वस्तात विकल्याबद्दल मारहाण

Patil_p

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

triratna
error: Content is protected !!