तरुण भारत

कबनूर ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर नियुक्तीबाबत सरपंचांचा मनमानी कारभार

वार्ताहर / कबनूर

कबनूर येथील ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर नियुक्तीबाबत सरपंच शोभा पवार यांनी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार ग्रामपंचायत मधील आठ सदस्यांनी हातकणंगले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केला आहे. विरोधी ताराराणी गटाचे सहा सदस्य व सत्ताधारी गटातील दोन सदस्यांनी या तक्रार अर्जावर सह्या केल्याने गावात खळबळ माजली आहे.

कबनुर तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायत मध्ये डाटा ऑपरेटर नियुक्तीबाबत 31 मार्च च्या मासिक मिटिंग मध्ये या विषयात चर्चा करण्यात आली ऑपरेटर नियुक्तीबाबत सर्व सदस्यांच्या संमतीने निवड करणे अथवा डाटा ऑपरेटर ची आवश्यकता नाही. असे शासन दरबारी कळविण्यात यावे असा निर्णय घेण्यास आला होता. तसे नमूदही केले असताना सरपंच शोभा पोवार यांनी मनमानी कारभार करून सदस्यांना विश्वासात न घेता तसेच मासिक मिटिंग मध्ये निर्णय न घेता व अर्जाची दखल न घेता परस्पर अर्जाचे शिफारस पत्र देऊन मनमानी कारभार केला आहे. तेव्हा शासन स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा असे गट विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे.

Advertisements

या तक्रार अर्जावर मधुकर मनेरे, सुधीर लीगाडे, समीर जमादार, सुनिता आडके, सुनील का डाप्पा, स्वाती काडाप्पा, रजनी गुरव, वैशाली कदम या आठ सदस्यांच्या सह्या आहेत. सत्ताधारी गटातील दोन सदस्यांनी तक्रार अर्जावर सह्या केल्या मुळे गावात हा एक चर्चेचा विषय बनला आहे. यावरून सत्ताधारी गटातील कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून सत्ताधारी गटातील आणखीन सदस्य विरोधी गटाला सामील होणार की सत्ताधारी गटाच्या पाठीशी राहणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Related Stories

कोल्हापूर : परप्रांतीय व्यापाऱ्याचा गडहिंग्लजकरांना ४० लाखांचा चुना

triratna

आमदार आसगावकर यांच्या विजयाने कोल्हापूरचा सन्मान – छ. शाहू महाराज

triratna

कोल्हापूर : आभार फाटा ते शाहूनगर रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?

triratna

उचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजाराचे थैमान, तातडीने उपाययोजनांची गरज

triratna

आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचा शपथविधी संपन्न

triratna

आसुर्लेत जीप-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

triratna
error: Content is protected !!