तरुण भारत

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: ५ आरोपींविरोधात दोषारोप निश्चितीस न्यायालयाची परवानगी

मुंबई/प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने पाच अरिपींविरोधात दोषारोपत्र निश्चितीस पपरवानगी दिली. यूएपीए कायद्यानुसार कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे यांचा समावेश आहे. यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे आणि दहशतीचा आरोप आहे.

दरम्यान, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पाच आरोपींच्या विरोधात दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. आता या प्रकऱणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे यांच्याविरुद्ध हत्येचा कट रचला असल्याचं निश्चित केलं आहे.

एएनआयच्या मते, आर्थर रोड जेल आणि हर्सुल जेलमध्ये असलेले आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना पुण्यातील येरवडा सेंट्रल जेलमध्ये स्थलांतरित करण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत. न्यायालयाने पाचही आरोपींच्या विरोधात आयपीसी 302, 120 बी, 34, यूएपीएच्या सेक्शन 16 आणि सेक्शन 3 (25), 27 (1), 27 (3) अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती.

Advertisements

Related Stories

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

भारतीय नौदलातील 21 नौसैनिकांना कोरोनाचा संसर्ग

prashant_c

सातारा तालुका शिवसेनेच्यावतीने वर्धापन दिन

Patil_p

पुणे विभागातील 75,812 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मनमोहन सिंग यांचे पीएम मोदींना पत्र; लसीकरण वाढवण्यास केल्या ‘या’ सुचना

triratna

“कारणं सांगू नका, माझ्या गतीने कामं करा”

triratna
error: Content is protected !!