तरुण भारत

नितीन सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

ओटवणे / प्रतिनिधी:

  कुणकेरी गावचे उपक्रम व प्रयोगशील तथा विद्यार्थी व समाज प्रिय शिक्षक नितीन सावंत यांच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट  योगदानाबद्दल त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.        यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, जिजाऊ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.     नितीन सावंत यांनी आपल्या १९ वर्षाच्या शैक्षणिक कार्याची सुरवात शिरशिंगे सारख्या दुर्गम गावातून केली. त्यानंतर सरमळे व आता आंबेगाव शाळेत ते कार्यरत आहेत. सावंतवाडी तालुका स्काऊट प्रतिनिधी असलेले नितीन सावंत जिल्ह्याच्या स्काऊट गाईड चळवळीत अग्रस्थानी असुन विविध उपक्रमाद्वारे त्यांनी समाजात जनजागृती केली आहे. त्यांचे शाळेतील गावठी भाजी बाजार आणि गणेश आरती आदी अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम लक्षवेधी ठरले. कोरोना संकट काळात विविध ऑनलाईन शिक्षण व विविध स्पर्धा घेऊन मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. कुणकेरी कला, क्रीडा व विकास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी विविध भरगच्च उपक्रम राबविले. नितीन सावंत यांच्या या चौफेर कार्याची दखल घेऊन त्यांची या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

Advertisements

Related Stories

करबुडेत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण

Patil_p

रत्नागिरी : वरवलीत आणखी ३ वाड्या कन्टेनमेंट झोन

triratna

कणकवली महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

NIKHIL_N

स्फोटसदृश आवाजाने किनारपट्टी हादरली

NIKHIL_N

पोलीस कर्मचाऱ्याने जपली रक्तातील माणुसकी

Ganeshprasad Gogate

जिल्हय़ात 341 जण कोरोना मुक्त

NIKHIL_N
error: Content is protected !!