तरुण भारत

जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

आळवण गल्ली-शहापूर येथील घटना, तिघा जणांविरुध्द एफआयआर

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

हुंडय़ासाठी सासरच्या जाचाला कंटाळून आळवण गल्ली-शहापूर येथील एका नवविवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतीसह तिघा जणांविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुस्कान रोहीम कागजी (वय 20, रा. आळवण गल्ली-शहापूर) असे त्या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. पती रोहीम इम्तियाज कागजी, सासरे इम्तियाज कागजी व हलीमा इम्तियाज कागजी या तिघा जणांविरूध्द भा.दं.वि. 498(ए), 304(बी), 306 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मुस्कानचा भाऊ अकीब महम्मदगौस मकानदार (रा. खंजर गल्ली) यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांचे सहकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत. मंगळवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7.30 यावेळेत ही घटना घडली आहे. या घटनेनंतर वादावादीचाही प्रसंग घडला आहे.

उपलब्ध माहितीनुसार केवळ 8 महिन्यांपूर्वी मुस्कान व रोहीम यांचे लग्न झाले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून माहेराहून हुंडा घेवून ये, असे सांगत पतीसह सासरच्या मंडळींनी तीला मारहाण सुरू केली होती. शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. ही गोष्ट मुस्कानने आपल्या माहेरवासीयांना सांगितल्यामुळे 15 दिवसांपूर्वी माहेरवासीयांनी 10 हजार रुपये दिले होते.

10 हजार रुपये दिल्यानंतरही तीचा छळ थांबला नाही. त्यामुळे मुस्कानला त्याचा मनस्ताप होत होता. जर तु गळफास घेऊन आत्महत्या केलीस तर आम्ही आरामात राहतो, असे सांगत तीच्या सासरवासीयांनी तीला आत्महत्येला प्रवृत केल्यामुळे तीने आपले जीवन संपविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात दंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मुस्कानचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

यल्लम्मा डोंगरावर चार लाखाहून अधिक भाविक

Patil_p

आसलेच्या ओमकार चव्हाण खून प्रकरणात आणखी तीघांना अटक

triratna

कर्नाटक : ‘लेक मॅन’ कामेगौडा कोरोना पॉझिटिव्ह

triratna

रत्नागिरी : अणदेरी येथील एकाचा नदीत पडून मृत्यू

triratna

हाडलगा येथील जवानाचा राजस्थानमध्ये आजाराने मृत्यू

Rohan_P

जिल्हय़ात सोमवारी 83 रुग्ण कोरोनामुक्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!