तरुण भारत

पंचमसाली लिंगायत समाजाचा 2ए प्रवर्गामध्ये समावेश करा

समाजाचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

लिंगायत धर्मामध्ये एकूण 13 पोट जाती आहेत. त्यामधील अनेक जातींचा 2 ए मध्ये समावेश केला गेला आहे. मात्र पंचमसाली समाजाला अजुनही 2ए मध्ये समाविष्ठ करण्यात आले नाही. कायद्यानुसार पंचमसालीला 2ए मध्ये समावेश करणे गरजेचे आहे. सहा महिन्यामध्ये या समाजाचा समावेश करू असे आश्वासन दिले होते. मात्र अजुनही त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पंचमसाली समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन सरकारकडे पाठपुरावा करून आम्हाला न्याय द्यावा अशी पंचमसाली समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

पंचमसाली समाज सध्या 3बी मध्ये आहे. त्या विरोधात न्यायालयात आम्ही दाद मागितली होती. मागासवर्गीय कायद्यानुसार प्रत्येक समाजाचा 10 वर्षानंतर सर्व्हे होणे बंधनकारक आहे. त्या समाजाची आर्थिक परिस्थिती पाहून त्यानंतर त्या समाजाला प्रवर्गामध्ये समाविष्ठ करणे किंवा प्रवर्गातून वगळणे हे सरकारचे काम आहे. मात्र लिंगायत समाजामधील अनेक पोटजातीचे मंत्री झाल्यानंतर कोणत्याही समाजाचा सर्व्हे न करताच त्या समाजाला 2 ए वर्गामध्ये समावि÷ करण्यात आले आहे. यामुळे इतर समाजावर अन्याय झाला आहे असा आरोप देखील यावेळी करण्यात आला.

पंचमसाली समाज हा आर्थिक बाबतीत मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाचा 2ए मध्ये समाविष्ठ करावे असा मागासवर्गीय आयोगाने देखील स्पष्ट केले आहे. असे असताना त्याकडे दुर्लक्ष झाले असून, आम्हाला तातडीने न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. डी. एम. पाटील, ऍड. बी. एस. सुलतानपुरे, ऍड. आर. सी. पाटील, ऍड. एस. बी. यडाल, ऍड. जी. एन. पाटील, ऍड. एम. एन. गदग, ऍड. एस. बी. पाटील, एन. एम. पाटील, व्ही. व्ही. पाटील यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.

Related Stories

मारुती गल्ली झाली ‘मारति गल्लि’

Amit Kulkarni

क्वीन्स गार्डन विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

Patil_p

सीमावासियांचा आवाज बुलंद करण्यासाठी शेळकेंना दिल्लीला पाठवा

Amit Kulkarni

बसस्थानकात कचऱयाची समस्या गंभीर

Patil_p

चौगुलेवाडीतील 65 नागरिक निवारा केंद्रात

Omkar B

किल्ला तलाव कधी स्मार्ट होणार?

Amit Kulkarni
error: Content is protected !!