तरुण भारत

मंत्री हसन मुश्रीफ यांची बदनामी सहन केली जाणार नाही

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

प्रतिनिधी / जयसिंगपूर

Advertisements

तथ्यहीन आरोप करून किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी कडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप करण्यात आले त्याचा आपण निषेध करीत असून मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांची बदनामी सहन केली जाणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते म्हणून व महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोतच, तसेच महाविकास आघाडी सरकार देखील मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या मागे खंबीरपणे ऊभे राहील अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी
प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे, महाविकास आघाडीचे सरकार अत्यंत चांगल्या प्रकारे राज्यात काम करत असताना महाविकास आघाडी सरकार कमकुवत करण्यासाठीचे सर्व ते प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील पावणे दोन वर्षापासून सुरू आहेत, यासाठी सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणेचा त्याच बरोबर आपल्या समर्थकांचा वापर केला जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यावरील आरोप याचाच भाग असल्याचे आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे.

स्वतःच्या कर्तुत्वाने जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून जनतेची सेवा करणाऱ्या नेतृत्वाला अशा पद्धतीने बदनाम जर केले जात असेल तर ही बाब कोल्हापूरची जनता कधीही सहन करणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांची कार्यशैली मी जवळून पाहिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप करणे थांबवावे, कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आरोप करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

मुस्लिम बोर्डिंगची अचानक तपासणी

triratna

रविकांत तुपकरांची ऑन दी स्पॉट मोहीम

triratna

कोझीकोडीतील ‘योद्धा’ चिपळूणचा, गावाशी नाळ आजही कायम

triratna

खोतवाडीत परप्रांतियांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दगडफेक

triratna

कोरोनामुळे एकाच कुंटूबातील तिघांचा मृत्यू : आईसह दोन मुले मृत्यूमुखी

triratna

संचारबंदीमध्ये शाहूपुरीत पाण्याचा ठणठणाट

Patil_p
error: Content is protected !!