तरुण भारत

संरक्षण मंत्रालयाच्या नव्या कार्यालयाचे आज उद्घाटन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत सरकारचा महत्त्वाचा प्रकल्प सेंट्रल व्हिस्टाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. प्रकल्पाची पहिली इमारत तयार झाली आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सर्वप्रथम संरक्षण मंत्रालयाचे ऑफिस कॉम्प्लेक्स तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या ऑफिस कॉम्प्लेक्सला दोन विविध ठिकाणी तयार करण्यात आले आहे. एक कॉम्प्लेक्स दिल्लीच्या कस्तूरबा गांधी मार्गावर तर दुरसे आफ्रिका ऍव्हेन्यू रोडवर आहे.

Advertisements

स्वातंत्र्योत्तर काळापासून संरक्षण मंत्रालयाची अनेक कार्यालये इंग्रंजाच्या काळात निर्माण आर्मी बॅरकमध्येच सुरू होती. पण आधुनिक काळातील सुविधांचा तेथे अभाव जाणवत होता. पण आता या विभागांना दोन विविध ऑफिस कॉम्प्लेक्समध्ये हलविले जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाची एकूण 27 कार्यालये विखुरली गेलेली होती. आता या कार्यालयांना आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त इमारतींमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे.

केजी मार्गावर 14 तर आफ्रिका ऍव्हेन्यू कॉम्प्लेक्समध्ये 13 विभागांची कार्यालये असतील. या दोन्ही इमारतींमध्ये एकूण 7 हजार कर्मचारी सामावले जाऊ शकतात. तसेच पार्किंगची समस्या तूर करण्यासाठी दोन्ही कॉम्प्लेक्समध्ये भूमिगत पार्किंग तयार करण्यात आले आहे. या पूर्ण प्रकल्पाचा खर्च 775 कोटी रुपये आहे.

Related Stories

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पद्मावती यांचे निधन

datta jadhav

व्हिसा फ्रॉडप्रकरणी अमेरिकेतील चार चिनी नागरिकांवर गुन्हा

datta jadhav

जीवनावश्यक वस्तू कायद्यात महत्वाच्या सुधारणा

Patil_p

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

Abhijeet Shinde

”खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

Abhijeet Shinde

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अडीचशेवर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!