तरुण भारत

पुणे – बेंगळूर महामार्गावर विचित्र अपघात; वाहतूक विस्कळीत

उचगाव / वार्ताहर

पुणे बेंगळूर महामार्गावर पंचगंगा पुलावर झालेल्या विचित्र अपघातात सहा वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. एखाद्या फिल्मीसीन प्रमाणे सहा वाहने महामार्गावर एकमेकांवर आदळले. कारला मोठ्या ट्रक कंटेनरने धडक दिली. यावेळी कार महामार्गाच्या मधोमध आली. त्यापाठोपाठ टेम्पों, बोलेरो अशी सहा वाहने एकमेकापाठोपाठ एकमेकांवर आदळली. वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.

ही घटना दुपारी दिडच्या सुमारास घडली. सुमारे अर्धा तास महामार्गाची वाहतूक खोळबंली. शिरोली फाट्यापर्यंत लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर कमानीपासून मार्केट यार्डपर्यंत रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी गांधीनगर पोलिस तात्काळ पोहचले. महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी बाजूला घेवून वाहतूक सुरळित केली. याबाबत गांधीनगर पोलिसांत रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती.

Advertisements

Related Stories

माजी रणजी क्रिकेटपटू ध्रुव केळवकर यांचे निधन

triratna

कोल्हापूर शहरात 220`आशां’साठी 1 गटप्रवर्तक

triratna

सातारा : घाडगे हॉस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

triratna

कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचा जिल्हा मेळावा उत्साहात संपन्न

triratna

कोल्हापूर : सहकार, शेती उद्ध्वस्त करण्याचे केंद्राचे धोरण

triratna

‘किसान सन्मान’ मधिल ५० हजार शेतकरी वंचित

triratna
error: Content is protected !!