तरुण भारत

चालती-फिरती ऑटोग्राफ डायरी

इसमाच्या पाठीवर 225 जणांच्या स्वाक्षरीचा टॅटू

जगातील अनेक लोकांना टॅटू काढून घेण्याचा छंद असतो. काही लोकांचे टॅटूसाठी प्रचंड वेड पाहता ते स्वतःच्या शरीराच्या बहुतांश हिस्स्यावर टॅटू काढून घेतात. पण फ्लोरिडातील एका व्यक्तीने टॅटू काढून घेण्याची एक अशी कल्पना शोधून काढली की त्याने विश्वविक्रमच स्वतःच्या नावावर केला आहे. या इसमाने स्वतःच्या पाठीवर 225 हून अधिक लोकांचा सिग्नेचर पर्मनंट टॅटू काढू घेतला आहे.

Advertisements

फंकी मॅटेस नावाचा हा व्यक्ती सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहे. फंकीचे खरे नाव जुआन मॅटेस आहे. जुआन एक टॅटू आर्टिस्ट असून त्याने अनेक लोकांना टॅटू काढून दिले आहेत. एकदा जुआनला स्वतःच्या शरीरावर टॅटू आर्ट तयार करण्याची कल्पना सुचली. प्रसिद्धी मिळेल अशाप्रकारचा टॅटू तो काढू इच्छित होता.

बराच वेळ विचार केल्यावर त्याला दोन पर्याय सुचले. स्वतःच्या पाठीवर माय स्पेस सारखा एक फॉर्म तयार करून घ्यावा, जो त्याचे कुटुंबीय किंवा मित्रांनी भरावा. अन्यथा स्वतःच्या मित्रांकडून स्वतःच्या पाठीवर टॅटू मशीनद्वारे स्वाक्षरी करून घ्यावी. जुआनने दुसरा पर्याय निवडून मित्रांकडून स्वाक्षरी करवून घेतली आहे. पण त्याचा ऑटोग्राफचा छंद वाढल्याने तो केवळ मित्रांपुरती मर्यादित राहिला नाही. त्याने स्वतःच्या नातलगांकडूनही टॅटू स्वाक्षरी काढून घेतली. फेमस टॅटू कलाकाराकडूनही स्वाक्षरी करविली आणि त्यानंतर सेलिब्रिटींच्या मागे लागला.

आता त्याच्या शरीरावर 225 पेक्षा अधिक टॅटू असून यात मार्व्हल कॉमिक्सचे स्टॅन ली, विल स्मिथ, जेरार्ड बटलर, स्पंज बॉब कार्टूनचा आवाज काढणारे व्हॉइस आर्टिस्ट, एलिजाह वुड, मायकल फॉक्स, ख्रिस्तोफर लॉयड यासारखी मोठी नावे सामील आहेत. शरीरावर 190 टॅटू झाल्यावर त्याचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले होते. 

Related Stories

बांगला देशात रोहिंग्या वस्तीला आग

Patil_p

मालीमध्ये सैनिकांचे सरकारविरोधी बंड; पंतप्रधानांसह राष्ट्रपतींना घेतले ताब्यात

datta jadhav

असा कसा हा मासा?

Amit Kulkarni

‘अनलॉक’मुळे ‘कोरोना विस्फोटा’चा धोका

Patil_p

कोरोना : जर्मनीने चीनकडे मागितली 130 अब्ज युरोची नुकसान भरपाई

prashant_c

चिनी भिकाऱयांकडे आता ई-वॉलेट

Patil_p
error: Content is protected !!